मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Medha Manjrekar Birthday: सेटवर आलेल्या मेधा यांना पाहताच प्रेमात पडले होते महेश मांजरेकर! ‘अशी’ होती क्युट लव्हस्टोरी..

Medha Manjrekar Birthday: सेटवर आलेल्या मेधा यांना पाहताच प्रेमात पडले होते महेश मांजरेकर! ‘अशी’ होती क्युट लव्हस्टोरी..

Harshada Bhirvandekar HT Marathi
Apr 28, 2023 07:49 AM IST

Happy Birthday Medha Manjrekar : महेश मांजरेकर यांच्या हट्टामुळे मेधा मांजरेकर यांचं मनोरंजन विश्वात पदार्पण झालं होतं. दोघांची लव्हस्टोरी देखील अगदीच फिल्मी आहे.

Medha and Mahesh Manjrekar love story
Medha and Mahesh Manjrekar love story

Happy Birthday Medha Manjrekar: मनोरंजन विश्वात महेश मांजरेकर हे नाव तसं खूप मोठं आहे. मात्र, महेश मांजरेकर यांच्या पत्नी मेधा मांजरेकर या देखील चित्रपटाचा पडदा गाजवत आहेत. आज (२८ एप्रिल) मेधा मांजरेकर आपला वाढदिवस साजरा करत आहेत. महेश मांजरेकर यांच्या हट्टामुळे मेधा मांजरेकर यांचं मनोरंजन विश्वात पदार्पण झालं होतं. दोघांची लव्हस्टोरी देखील अगदीच फिल्मी आहे. मेधा यांना पाहताच क्षणी पहिल्याच नजरेत महेश मांजरेकर प्रेमात पडले होते.

ट्रेंडिंग न्यूज

अभिनेते-दिग्दर्शक- निर्माते महेश मांजरेकर हे १९९५मध्ये ‘आई’ नावाचा चित्रपट करत होते. याच चित्रपटाच्या सेटवर एकदा मेधा आल्या होत्या. मेधा या दिसायला खूप सुंदर होत्या. पहिल्या भेटीतच एक अभिनेत्री म्हणून त्या महेश मांजरेकर यांच्या पसंतीस उतरल्या होत्या. मेधानेच आपल्या चित्रपटात काम करावे अशी महेश यांनी इच्छा होती. यासाठीच महेश मांजरेकर यांनी अभिनेत्री नीना कुलकर्णी यांच्याकडे मेधा यांचा मोबाईल नंबर मागितला. मात्र, त्या मुलीचा चित्रपटाशी आणि अभिनयाशी काहीच संबंध नाही, असे नीनाताई म्हणाल्या.

Samantha Ruth Prabhu Birthday: कुटुंबावर आलेल्या आर्थिक अडचणींमुळे समंथाने केली होती मॉडेलिंगची सुरुवात!

मात्र, काहीही झाले तरी मेधानेच आपल्या चित्रपटात काम करावे, असा महेश मांजरेकर यांचा हट्ट होता. त्यामुळे महेश मांजरेकर यांनी थेट मेधा यांना फोन लावून चित्रपटासाठी होकार मिळवलाच. मेधा यांनी महेश मांजरेकर यांच्या चित्रपटात काम करण्यास होकार दर्शवला, पण एक अट देखील ठेवली. मेधा त्यावेळी युरोप टूरवर होत्या. त्यामुळे तिकडून आल्यानंतर शूटिंगला सुरुवात करणार असे मेधा यांनी सांगितले. महेश मांजरेकर यांनी देखील मेधाची ही अट मान्य केली आणि चित्रपटाचे शूटिंग पुढे ढकलले.

अखेर मेधा यांनी त्यांच्या या चित्रपटात काम केले. पुढे, मेधा केवळ त्यांच्या या चित्रपटातच नाही तर त्यांच्या आयुष्यात देखील आल्या. महेश आणि मेधा यांचे हे दुसरे लग्न आहे. या दोघांनीही त्यांच्या पहिल्या जोडीदारांना घटस्फोट दिला होता. महेश यांना पहिल्या पत्नीपासून २ मुले असून मेधा यांना पहिल्या पतीपासून एक मुलगी आहे. महेश आणि मेधा या दोघांना सई मांजरेकर नावाची मुलगी आहे.

लग्नानंतरही मेधा यांनी महेश मांजरेकर यांच्या ‘काकस्पर्श’, ‘दे धक्का’, ‘नटसम्राट’, ‘एफ. यू’, ‘नायलॉन– बंध रेशमाचे’ अशा अनेक चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत. मेधा यांनी स्किन ट्रीटमेंटमध्ये स्पेशलायझेशन केले आहे. स्किनवरील सर्व ट्रीटमेंट करणे हेच त्यांचं पॅशन आहे, असं त्या स्वतः एका मुलाखतीत म्हणाल्या होत्या.

IPL_Entry_Point

विभाग