Viral Video: आधी पाठलाग नंतर शिवीगाळ; अभिनेत्याबरोबर मुंबईत घडला धक्कादायक प्रकार-karan wahi harassed by a stranger on mumbai street video viral ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Viral Video: आधी पाठलाग नंतर शिवीगाळ; अभिनेत्याबरोबर मुंबईत घडला धक्कादायक प्रकार

Viral Video: आधी पाठलाग नंतर शिवीगाळ; अभिनेत्याबरोबर मुंबईत घडला धक्कादायक प्रकार

Aarti Vilas Borade HT Marathi
Feb 08, 2024 08:24 AM IST

Karan Wahi Viral Video: अभिनेत्याने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्याने घडलेला धक्कादायक प्रकार सांगितला आहे.

Karan Wahi Viral Video
Karan Wahi Viral Video

Karan Wahi Video: छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय अभिनेता म्हणून करण वाही ओळखला जातो. त्याच्या प्रत्येक भूमिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. सध्या सोशल मीडियावर करणची एक पोस्ट व्हायरल झाली आहे. या पोस्टमध्ये त्याने मुंबईत एका अनोळखी व्यक्तीकडून त्रास सहन करावा लागला याबाबत माहिती दिली आहे. त्याच्या या पोस्टची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे.

करणने सोमवारी रात्री त्याच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये स्कूटरवर बसलेली एक व्यक्ती करणचा पाठलाग करत आहे आणि त्याच्याशी शाब्दिक वादही घालताना दिसत आहे. करणने व्हिडीओमध्ये बोलत आहे की, “हा माणूस मी चूक केलीय असे म्हणतोय पण खरंतर यानेच माझ्या गाडीचा पाठलाग करत गाडीला धडक दिली. मुंबई पोलीस कृपया मला मदत करा. हा त्याची चूक मान्य करून हे प्रकरण थांबवत नाहीये.”
वाचा: बॉलिवूड सिनेमांना टक्कर देतोय ‘सत्यशोधक’; पाचव्या आठवड्यातही प्रतिसाद

व्हिडीओमध्ये पुढे दिसत आहे की करणने कॅमेरा त्या माणसाकडे वळवला आणि म्हणाला, “हा माणूस माझ्या मागे लागलाय. तू जेवढी मला शिवीगाळ केलीयस ना, तू थांब तुझ्याकडे आता पोलीसच येतील.”

करणचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

सोशल मीडियावर करणचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ शेअर करत करणने, “माझ्याबरोबर जी घटना घडली त्याबाबत मी थोडक्यात सांगतो, माझ्यापुढे एक गाडी असल्याने मी लगेच उजव्या बाजूने ओव्हरटेक करत पुढे गेलो. या माणसाने मला शिवीगाळ केली आणि म्हणाला तू गाडी बाजूने काढलीच कशी? मग तो पुढे म्हणाला की तुझ्यासारखे अभिनेते खूप पाहिले आहेत मी. मग मी त्याच्या स्कूटरची चावी घेतली आणि परत दिली व तिथून निघालो. मी पोलीस स्टेशनला पोहोचेपर्यंत त्याने माझा पाठलाग केला. तो शिवीगाळ करत मला म्हणाला की, त्याची पोलिसांत ओळख आहे आणि तो मला याबद्दल चांगलीच अद्दल घडवेल” या आशयाचे कॅप्शन दिले आहे.

करणने व्यक्त केली कृतज्ञता

करणची ही पोस्ट व्हायरल झाल्यावर अनेकांनी चिंत्ता व्यक्त केली. त्याला अनेकजण फोन आणि मेसेज करु लागले. त्यानंतर करणे पुन्हा सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत कृतज्ञता व्यक्त केली. “मी सुरक्षित आहे, मी घरी पोहोचलो आहे. पोलिसांशी माझं बोलणे झाले. यावर तोडगा निघेल अशी आशा आहे. धन्यवाद मुंबई पोलीस” असे त्याने पोस्टमध्ये म्हटले.

विभाग