मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Shehnaaz Gill Birthday: ‘पंजाबची कतरिना कैफ’ शहनाज गिलबद्दल ‘या’ गोष्टी माहितीयेत का?
Shehnaaz Gill
Shehnaaz Gill

Shehnaaz Gill Birthday: ‘पंजाबची कतरिना कैफ’ शहनाज गिलबद्दल ‘या’ गोष्टी माहितीयेत का?

27 January 2023, 7:53 ISTHarshada Bhirvandekar

Happy Birthday Shehnaaz Gill: बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि शहनाज गिल या दोघींच्या चेहऱ्यात बरंच साम्य आहे. यामुळेच शहनाज गिलला पंजाबी मनोरंजन विश्वात ‘पंजाबची कतरिना कैफ’ म्हटले जाते.

Happy Birthday Shehnaaz Gill: टीव्ही विश्वातली चुलबुली अभिनेत्री म्हणून शहनाज गिलचं नाव घेतलं जातं. ‘बिग बॉस’मधून घराघरांत लोकप्रिय झालेली शहनाज गिल तिच्या आणि अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या नात्यामुळे देखील चर्चेत आली होती. मात्र, सिद्धार्थ शुक्लाच्या निधनामुळे ही लोकप्रिय जोडी तुटली. सिद्धार्थच्या जाण्याने शहनाजला देखील मोठा धक्का बसला होता. मात्र, अभिनेत्री आता यातून सावरत असून, हळूहळू तिचं आयुष्य पूर्वपदावर येत आहे. सध्या शहनाज तिच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात ती सलमान खानसोबत झळकणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

शहनाज गिल ही केवळ एक अभिनेत्री नसून, ती उत्तम गायिका देखील आहे. शहनाज लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असली, तरी ती पंजाबी मनोरंजन विश्वात प्रचंड सक्रिय आहे. ‘काला शाह काला’ या पंजाबी चित्रपटातून शहनाजने मनोरंजन विश्वात पाऊल ठेवले होते. या चित्रपटात शहनाजसोबत टीव्ही अभिनेत्री सरगुन मेहता देखील झळकली होती. या चित्रपटाची गाणी तुफान गाजली होती.

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि शहनाज गिल या दोघींच्या चेहऱ्यात बरंच साम्य आहे. यामुळेच शहनाज गिलला पंजाबी मनोरंजन विश्वात ‘पंजाबची कतरिना कैफ’ म्हटले जाते. ‘बिग बॉस’च्या घरात देखील स्वतः सलमान खान याने देखील शहनाज गिलला ‘पंजाबची कतरिना कैफ’ म्हटले होते. मूळची पंजाबी असलेली शहनाज ‘बिग बॉस’ या शोमुळे देशभरातील लोकांची लाडकी बनली आहे. आपल्या चुलबुल्या अंदाजाने तिने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत.

अभिनेत्री शहनाज गिल लवकरच सलमान खानसोबत ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटात झळकणार आहे. शहनाजचा हा पहिलाच चित्रपट असून, नुकताच या चित्रपटाचा टीझर देखील प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. आता हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये देखील उत्सुकता निर्माण झाली आहे. ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटाच्या टीझरमध्ये सलमानसोबतच शहनाज गिलची झलक देखील पाहायला मिळाली आहे.

विभाग