मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Annu Kapoor : अचानक छातीत दुखू लागल्यानं अभिनेते अन्नू कपूर रुग्णालयात; डॉक्टर म्हणाले…

Annu Kapoor : अचानक छातीत दुखू लागल्यानं अभिनेते अन्नू कपूर रुग्णालयात; डॉक्टर म्हणाले…

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Jan 27, 2023 11:40 AM IST

Annu Kapoor Heart Attack : दमदार अभिनयामुळं बॉलिवूडवर छाप सोडणारे अभिनेते अन्नु कपूर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Annu Kapoor Heath Update
Annu Kapoor Heath Update (HT)

Annu Kapoor Heath Update : छातीत त्रास व्हायला लागल्यानंतर बॉलिवूड अभिनेते अन्नु कपूर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. छातीत कळ येत असल्यानं आणि रक्तदाब वाढल्यामुळं त्यांना त्रास होत होता. त्यानंतर त्यांना उपचारासाठी दिल्लीतल्या सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून प्रसिद्ध कॉर्डिओलॉजीस्ट डॉ. सुशांत यांच्या देखरेखीखाली अन्नु कपूर यांच्यावर उपचार केले जात असल्याची माहिती आहे. छातीत त्रास व्हायला लागल्यानंतर कपूर यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून ते उपचाराला प्रतिसाद देत आहेत. सध्या त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती सर गंगा राम हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉ. अजय स्वरूप यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

अभिनेते अन्नु कपूर यांनी आतापर्यंत बॉलिवूडमधील 'एक रुका हुआ फैसला', 'राम लखन', 'घायल', 'हम किसीसे कम नहीं', 'ऐतराज', '7 खून माफ' आणि 'जॉली' या चित्रपटांत काम केलेलं आहे. अन्नू कपूर यांचा जन्म मध्यप्रदेशमधल्या भोपाळमध्ये झाला होता. कुटुंबाची आर्थिक स्थिती बेताची असल्यामुळं पैशांअभावी अन्नू कपूर यांना शिक्षण अर्धवट सोडावं लागलं होतं. त्यानंतर त्यांनी वडील मदनलाल यांच्याबरोबर थिएटरमध्ये जाण्यास सुरुवात केली. अभिनयाची आवड निर्माण झाल्यानंतर त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रवेश घेतला. त्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही.

गेल्या काही दिवसांपासून त्यांची तब्येत बरी नव्हती. परंतु आता अचानक त्यांच्या छातीत दुखू लागल्यानं त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आल्यामुळं बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे. त्यानंतर आता अनेक अभिनेते आणि चाहत्यांनी अन्नु कपूर यांच्या स्वास्थासाठी प्रार्थना करायला सुरुवात केली आहे.

WhatsApp channel

विभाग