मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Gautami Patil: लावणी स्टार गौतमी पाटील दिसणार वेब सीरिजमध्ये

Gautami Patil: लावणी स्टार गौतमी पाटील दिसणार वेब सीरिजमध्ये

Aarti Vilas Borade HT Marathi
Jan 18, 2023 05:41 PM IST

Gautami Patil Web Series: स्वत: गौतमीने प्रसार माध्यमांशी बोलताना डिजिटल विश्वात पदार्पण करत असल्याचे सांगितले आहे.

गौतमी पाटील
गौतमी पाटील (HT)

महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी लावणी करत प्रेक्षकांना वेड लावणारी गौतमी पाटील सतत चर्चेत असते. तिच्या लावणीवर अनेकजण फिदा आहेत. आता गौतमी एका सीरिजमध्ये दिसणार आहे. चाहत्यांमध्ये गौतमीच्या सीरिजबाबत उत्सुकता पाहायला मिळते.

ट्रेंडिंग न्यूज

गौतमीने स्वत: प्रसार माध्यमांशी बोलताना डिजिटल विश्वात पदार्पण करणार असल्याची माहिती दिली आहे. गौतमी सोशल मीडिया स्टार आहे. तिच्या डान्सचे अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात. मात्र, डान्स करताना तिच्या हावभावांमुळे तिला ट्रोल केले जात आहे. आता ती नेमकं कोणत्या सीरिजमध्ये दिसणार? कोणती भूमिका साकारणार? असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडले आहेत. तिच्या सीरिजबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
वाचा: इथे कोणी तरी आहे; बिग बॉस फेम जय दुधाणेच्या ‘गडद अंधार’चा ट्रेलर प्रदर्शित

जबरदस्त नृत्यानं संपूर्ण तरुणाईला वेड लावणारी सोशल मीडिया स्टार नृत्यांगणा गौतमी पाटील हिचा पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातल्या निमगाव केतकी या गावात २७ डिसेंबर रोजी लावणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. परंतु या गौतमीच्या कार्यक्रमासाठी गावकऱ्यांनीच जागा देण्यास नकार दिल्यानं सुरक्षेच्या कारणास्तव हा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचं आयोजकांनी सांगितलं आहे. गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांवर बंदी घालण्याची मागणी जोर धरत असतानाच आता ती वेब विश्वात पदार्पण करणार असल्याचे समोर आले आहे.

IPL_Entry_Point

विभाग