मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Gadad Andhar: इथे कोणी तरी आहे; बिग बॉस फेम जय दुधाणेच्या ‘गडद अंधार’चा ट्रेलर प्रदर्शित

Gadad Andhar: इथे कोणी तरी आहे; बिग बॉस फेम जय दुधाणेच्या ‘गडद अंधार’चा ट्रेलर प्रदर्शित

Aarti Vilas Borade HT Marathi
Jan 17, 2023 08:33 PM IST

Gadad Andhar Trailer: ३ फेब्रुवारी रोजी ‘गडद अंधार’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

गडद अंधार
गडद अंधार (HT)

पाण्याखालचं विश्व दाखवणारा 'गडद अंधार' हा मराठीतील पहिला सिनेमा रसिकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. फर्स्ट लुक रिलीज झाल्यापासूनच सर्वांच्या मनात या चित्रपटाबद्दल कुतूहल आहे. 'गडद अंधार'बाबतची उत्कंठा शिगेला पोहोचली असली तरी हा चित्रपट पाहण्यासाठी रसिकांना ३ फेब्रुवारीपर्यंत वाट पहावी लागणार आहे. या चित्रपटातील 'दरिया...' हे गाणं नुकतंच संगीतप्रेमींच्या भेटीला आलं असून, या गाण्याला रसिकांचा तूफान प्रतिसाद मिळत आहे. आता या चित्रपटातील म्युझिकसह ट्रेलरही रिलीज करण्यात आला आहे. 'गडद अंधार'च्या ट्रेलरचं सोशल मीडियावर कौतुक होत असून, अल्पावधीतच लाखो व्ह्युजही मिळाले आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

'गडद अंधार'चा ट्रेलरही रसिकांचं लक्ष वेधून घेत आहे. या चित्रपटाचं बरंचसं चित्रीकरण पाण्याखाली करण्यात आलं आहे. त्यामुळे समुद्राच्या तळाशी असलेलं विश्वही यात पहायला मिळणार असल्याची झलक ट्रेलरमध्ये दिसते. गाण्यांच्या जोडीला यातील अर्थपूर्ण संवाद मनाला भिडतात. ट्रेलरमधील प्रसंग 'गडद अंधार'बाबतची उत्सुकता आणखी वाढवणारे आहेत.
वाचा: जीम वर्कआऊटमुळे राजू श्रीवास्तव यांचे निधन झाले?; मुलीने दिले उत्तर...

दरिया... या गाण्याची पार्श्वभूमी असलेल्या ट्रेलरमध्ये पाण्याखालच्या गडद अंधारात कोणतं रहस्य दडलं आहे याची झलक दिसते. 'या खोल समुद्रात किती आणि कोणत्या प्रकारची रहस्यं दडलीत हे सांगणं तेवढंच कठीण आहे', हा ट्रेलरमधील संवाद चित्रपटातील रहस्य आणखी गडद करणारा आहे.

'गडद अंधार' या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रज्ञेश रमेश कदम यांनी केले आहे. या चित्रपट चित्रपटामध्ये अभिषेक खणकरनं लिहिलेलं आणि गायक-संगीतकार रोहित श्याम राऊतनं स्वत:च्या आवाजात 'दरिया, दरिया...' हे गाणे संगीतबद्ध केले आहे. जय दुधाणे या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. अभिनेत्री नेहा महाजन त्याच्या साथीला आहे. याशिवाय शुभांगी तांबळे, आकाश कुंभार, चेतन मुळे, आरती शिंदे, श्री, बालकलाकार अस्था आदी कलाकारांनीही विविध व्यक्तिरेखा साकारल्या आहेत.

IPL_Entry_Point

विभाग