मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  First Superstar: ना रजनीकांत ना बीग बी, सर्वात पहिला महागडा अभिनेता कोणता?

First Superstar: ना रजनीकांत ना बीग बी, सर्वात पहिला महागडा अभिनेता कोणता?

Aarti Vilas Borade HT Marathi
Dec 31, 2023 11:32 AM IST

First Superstar Who Charged 1 Crore: ९० च्या दशकात या सुपरस्टार अभिनेत्याने सर्वात पहिले १ कोटी रुपये चित्रपटाचे माधनधन घेतले होते. हा अभिनेता कोण जाणून घेऊया...

Rajinikanth and Big Bi
Rajinikanth and Big Bi

कलाकार हे कायमच त्यांच्या आलिशान लाइफसाठी ओळखले जातात. मग ते बॉलिवूड कलाकार असोत किंवा दाक्षिणात्य. त्यांच्या लग्झरी लाइफविषयी जाणून घेण्यासाठी चाहते कायमच उत्सुक असतात. कलाकारांचे सिनेमे हे सुपरहिट तर होत असतात. मात्र, या सिनेमांसाठी ते कोट्यवधी रुपये मानधन घेताना दिसतात. आजकाल कलाकार हे सरास कोट्यवधी रुपये मानधन घेतात. पण ९०च्या दशकात आणि सर्वात पहिले १ कोटी रुपये मानधन घेणारा पहिला अभिनेता कोण? हे तुम्हाला माहिती आहे का? चला जाणून घेऊया...

९० च्या दशकात बॉलीवूड इंडस्ट्रीवर अमिताभ बच्चन यांचा बोलबाला होता, तर साऊथ चित्रपटसृष्टीत रजनीकांत यांचे एकतर्फी राज्य होते. अमिताभ बच्चन व रजनीकांत ९० च्या दशकातील सुपरस्टार असल्यामुळे त्याकाळी ते एका चित्रपटासाठी लाखो रुपयांचे मानधन घ्यायचे. अमिताभ बच्चन एका चित्रपटात काम करण्यासाठी जवळपास ९० लाख रुपये फी आकारायचे. मात्र, दक्षिणात्य अभिनेते चिरंजीवी यांनी मानधनाच्या बाबतीत अमिताभ बच्चन व रजनीकांत यांनाही मागे टाकले. १९९१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आपडबांधवुडू’साठी चिरंजीवी यांनी १.२५ कोटी रुपये फी आकारली होती.
वाचा: शेवटच्या भागात अमिताभ बच्चन यांनी विचारला हेलनबद्दल प्रश्न! तुम्हाला माहितीये का उत्तर?

‘आपडबांधवुडू’ या चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर हा चित्रपट तुफान हिट ठरला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर रातोरात चिरंजीवी हे प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचले. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले. त्यांचे बरेच चित्रपट तुफान हिट झाले. २०१८मध्ये चिरंजीवी यांनी चित्रपटसृष्टीला रामराम ठोकला. त्यांच्या या घोषणेने चाहते चकीत झाले होते. पण इंडस्ट्रीमधून ब्रेक घेऊन चिरंजीवी हे राजकारणात सक्रिय असल्याचे पाहायला मिळते.

WhatsApp channel