मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Raju Srivastav Viral Video: "यमराज आला तरी..." कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचा व्हिडीओ पुन्हा चर्चेत!

Raju Srivastav Viral Video: "यमराज आला तरी..." कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचा व्हिडीओ पुन्हा चर्चेत!

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Sep 21, 2022 12:38 PM IST

Raju Srivastav Death: एका व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये त्यांनी यमराजाबद्दल एक खास गोष्ट सांगितली होती.

राजू श्रीवास्तव
राजू श्रीवास्तव (rajusrivastavaofficial / Twitter )

प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण मनोरंजन इंडस्ट्री आणि चाहते दु:खी झाले आहेत. आपल्या विनोदांनी प्रेक्षकांच्या हृदयात वेगळी छाप सोडणाऱ्या या दिग्गज कलाकाराच्या आरोग्यासाठी प्रत्येकाने प्रार्थना केली. मात्र बुधवारी दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. या दुःखद बातमीने त्यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओची आठवण झाली ज्यामध्ये त्यांनी यमराजाबद्दल एक खास गोष्ट सांगितली होती.

ट्रेंडिंग न्यूज

यमराज आला तरी...

सोशल मीडियाच्या माध्यमातून राजू श्रीवास्तव त्याच्या सिग्नेचर स्टाइलचे विनोद करत अनेक व्हिडिओ त्याच्या चाहत्यांसाठी पोस्ट करत असत. राजू श्रीवास्तव यांच्या दुःखद निधनावर, त्यांचा व्हिडीओ आठवतो ज्यामध्ये त्यांनी सांगितले होते की एखाद्या व्यक्तीने त्याच्या मृत्यूपर्यंत कसे असावे?. हा व्हिडिओ पोस्ट करत राजू श्रीवास्तव यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, 'तुम्ही यमराजाच्या म्हशीवर बसाल का?' या व्हिडीओमध्ये ते नक्की काय म्हणाले ते जाणून घेण्यासाठी बघा हा पूर्ण व्हिडीओ...

१० ऑगस्ट रोजी जिममध्ये व्यायाम करत असताना त्यांची प्रकृती खालावली होती. यानंतर त्यांना दिल्लीच्या एम्समध्ये दाखल करण्यात आले. तेथे त्याच्यावर उपचार सुरू होते. प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना लाईफ सपोर्ट सिस्टीमवर ठेवण्यात आले होते. दरम्यान, त्याच्या कुटुंबीयांकडून आणि सहकाऱ्यांकडून सतत अपडेट्स मिळत होते. उपचारादरम्यान त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याची बातमीही आली होती, मात्र आता त्यांच्या निधनाच्या दु:खद बातमीने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.

गजोधर भैय्या

राजू श्रीवास्तव यांच्या गजोधर भैय्या या व्यक्तिरेखेची कॉमेडी प्रेक्षकांना खळखळून हसवायची. मध्यमवर्गीय जीवनाशी निगडित कथा विनोदाच्या रूपात त्यांनी मांडल्या. यादव, संकट, गजोधर, बिरजू यांच्या कथांपासून ते राजकारण्यांची पाय खेचण्यापर्यंतचे अतुलनीय कौशल्य राजू श्रीवास्तव वगळता इतर कोणत्याही विनोदवीरात क्वचितच पाहायला मिळते.

IPL_Entry_Point

विभाग