मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Raju Srivastav: राजू श्रीवास्तव यांचं खरं नाव काय होतं? दाऊदनं त्यांना धमकी का दिली होती?

Raju Srivastav: राजू श्रीवास्तव यांचं खरं नाव काय होतं? दाऊदनं त्यांना धमकी का दिली होती?

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Sep 21, 2022 12:04 PM IST

Raju Srivastav Passes Away: सर्व सोशल मीडियावर त्याच्या नावाचा हॅशटॅग ट्रेंड करत आहेत. त्यांच्याविषयी जास्त सर्च केलं जात आहे.

कॉमेडियन राजू श्रीवास्तव
कॉमेडियन राजू श्रीवास्तव (HT)

आपल्या सर्वोत्कृष्ट कॉमेडीने आणि आपल्या आनंदी स्वभावाने लोकांच्या चेहऱ्यावर नेहमीच हसू आणणारे कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांनी आज जगाचा निरोप घेतला. आज बुधवारी २१ सप्टेंबर रोजी सकाळी १०.२० च्या सुमारास राजू यांचे निधन झाले. राजू श्रीवास्तव यांचे निधन झाल्यापासून चाहत्यांना त्यांच्याबद्दल अधिकाधिक जाणून घेण्याची इच्छा आहे. सर्व सोशल मीडियावर त्याच्या नावाचा हॅशटॅग ट्रेंड करत आहेत. त्यांच्याविषयी जास्त सर्च केलं जात आहे. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला राजूबद्दल काही खास गोष्टी सांगत आहोत.

ट्रेंडिंग न्यूज

राजू श्रीवास्तव यांच्या खास गोष्टी...

  • राजू श्रीवास्तव हे उत्तर प्रदेशातील कानपूरचे रहिवासी होते आणि त्यांचे खरे नाव सत्य प्रकाश श्रीवास्तव होते.
  • राजू श्रीवास्तव यांचे वडील रमेशचंद्र श्रीवास्तव हे कवी होते, त्यांना लो बलई काका म्हणून ओळखले जात असे.
  • राजू श्रीवास्तव हे लहानपणापासूनच उत्तम नक्कल करणारे कलाकार होते आणि त्यांनी लहान वयातच ठरवले होते की त्यांना विनोदी कलाकार व्हायचे आहे.
  • राजू श्रीवास्तव यांनी अनिल कपूर आणि माधुरी दीक्षितच्या तेजाब या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
  • राजू श्रीवास्तव एके काळी भारतातील सर्वाधिक कमाई करणारे कॉमेडियन होते ते त्यांच्या उत्कृष्ट विनोदी आणि अचूक वेळेमुळे.
  • राजू श्रीवास्तव यांनी शेखर सुमनचा टीव्ही शो देख भाई देख (१९९४) मध्येही कॅमिओ केला होता.
  • राजू श्रीवास्तव यांनी मुकेश खन्ना यांच्या 'शक्तिमान' या सुपरहिरो शोमध्येही काम केले होते.
  • राजू श्रीवास्तव यांनी बाजीगर, मैने प्यार किया आणि मैं प्रेम की दिवानी हूं यासह काही हिट बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केले आहे.
  • २०१३ मध्ये राजू श्रीवास्तवने नच बलिए ६ या डान्स रियालिटी शोमध्ये परफॉर्म केले होते.

Raju Srivastava: प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांंचं निधन; एम्स रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

 

दाऊदनं दिली होती धमकी

एकदा राजूला दाऊद इब्राहिमवर विनोद केल्यामुळे धमक्याही आल्या होत्या. २०१० मध्ये राजूने दाऊदवर काही विनोद सांगितले होते जे मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले होते, अशा परिस्थितीत जेव्हा त्याच्या क्लिप व्हायरल झाल्या तेव्हा त्याला पाकिस्तानकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. राजूलाच नाही तर त्याच्या कुटुंबालाही धमक्या दिल्या जात होत्या. या धमक्यांना राजू घाबरत नसले तरी त्याचे सचिव राजेश शर्मा यांनाही धमक्या येऊ लागल्यावर त्यांनी पोलिस बंदोबस्त घेतला.

IPL_Entry_Point

विभाग