मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Raju Srivastava: प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांंचं निधन; एम्स रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

Raju Srivastava: प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांंचं निधन; एम्स रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Sep 21, 2022 12:08 PM IST

Comedian Raju Srivastava passes away: कोमात गेलेल्या राजू श्रीवास्तव यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू होते.

Raju Srivastava
Raju Srivastava

Raju Srivastava Death: गेल्या महिनाभरापासून मृत्यूशी झुंज देत असलेले प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचं आज निधन झालं. दिल्लीतील एम्स रुग्णालयात सकाळी १०.२० मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ५९ वर्षांचे होते. जीममध्ये वर्कआउट करत असताना हृदयविकाराचा झटका आलेल्या राजू श्रीवास्तव यांना १० ऑगस्ट रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. कोमात गेलेल्या श्रीवास्तव यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते.

ट्रेंडिंग न्यूज

ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) मध्ये दाखल झालेले ज्येष्ठ विनोदी कलाकार राजू श्रीवास्तव यांचे वयाच्या ५८ व्या वर्षी निधन झाले. राजू श्रीवास्तव एम्समध्ये लाइफ सपोर्ट सिस्टमवर होते. १५ दिवसांनी व्हेंटिलेटरवर राहिल्यानंतर विनोदी कलाकार शुद्धीवर आले. मात्र, १ सप्टेंबर रोजी त्यांना १०० अंशांपर्यंत ताप आल्याने त्यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले.पण आज २१ सप्टेंबर रोजी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या निधनानंतर बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. अनेकजण सोशल मीडिया पोस्टद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून राजू श्रीवास्तव दिल्लीमधील एका हॉटेलमध्ये राहात होते. तेथील जीममध्ये ट्रेडमिलवर एक्सरसाइज करत असताना त्यांच्या अचानक छातीत दुखू लागले आणि ते खाली कोसळले. त्यानंतर तातडीने राजू यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. काही राजकीय नेत्यांना भेटण्यासाठी राजू दिल्लीत थांबले होते.

राजू श्रीवास्तव कॉमेडिचा बादशाह म्हणून ओळखले जात होते. त्यांनी आजवर अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे. त्यांच्या विनोदीवृत्तीने चाहत्यांना खळखळून हसवले. त्यांनी करिअरची सुरुवात एका स्टेज शोने केली होती. त्यानंतर बॉलिवूडमधील काही चित्रपटात छोटे रोल त्यांनी केले होते. त्यांना 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज' या शोने खरी ओळख मिळवून दिली. या शोचे ते सेकंड रनरअप ठरले.

राजू यांनी 'बिग बॉस ३', 'नच बलिए ६' अशा काही रिअ‍ॅलिटी शोमध्ये देखील सहभाग घेतला होता. ते 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल शर्मा' या शोमध्ये देखील दिसले होते. राजू हे एक अभिनेता, कॉमेडियन आणि राजकिय नेते आहेत. २०१४ मध्ये त्यांनी भाजप पक्षात प्रवेश केला होता.

 

 

IPL_Entry_Point

विभाग