Chhatrapati Sambhaji: अखेर ‘छत्रपती संभाजी’च्या मार्गातील अडथळा झाला दूर! ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला-chhatrapati sambhaji marathi movie releasing on 26 january 2024 after battling with many obstacles ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Chhatrapati Sambhaji: अखेर ‘छत्रपती संभाजी’च्या मार्गातील अडथळा झाला दूर! ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Chhatrapati Sambhaji: अखेर ‘छत्रपती संभाजी’च्या मार्गातील अडथळा झाला दूर! ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Jan 16, 2024 08:29 AM IST

Chhatrapati Sambhaji Marathi movie: अद्वितीय राजकरण, आक्रमक रणनीती आणि कौशल्याच्या बळावर छत्रपती संभाजी महाराजांनी निर्माण केलेला धगधगता इतिहास या चित्रपटातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

Chhatrapati Sambhaji Marathi movie
Chhatrapati Sambhaji Marathi movie

Chhatrapati Sambhaji Marathi movie: छत्रपती शिवाजी महाराजांचा दैदीप्यमान इतिहास अनेक चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. तर, धाकले महाराज अर्थात छत्रपती संभाजी महाराजांचा पराक्रम देखील अनेक चित्रपट मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या सगळ्या दरम्यान छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्यावर आधारित ‘छत्रपती संभाजी’ चित्रपटाच्या प्रदर्शनाला हिरवा कंदील मिळत नव्हता. गेले कित्येक वर्षे हा चित्रपट रखडला होता. मात्र, आता चित्रपटाच्या प्रदर्शनातील अडथळा दूर झाला आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास म्हणजे स्वराज्य रक्षणाचं महादिव्य होतं. आपल्या वडिलांची अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आणि आऊसाहेबांचा आशीर्वाद या बळावर त्यांनी स्वराज्याची भिस्त कायम सांभाळून ठेवली. त्यांच्या याच पराक्रमांची गाथा आगामी मराठी चित्रपट ‘छत्रपती संभाजी’मधून मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून या चित्रपटाच्या प्रदर्शनात अनेक अडथळे येत होते. मात्र, आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. येत्या २६ जानेवारीला ‘छत्रपती संभाजी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे.

Vijay Sethupathi Birthday: कधीकाळी सेल्समन म्हणून काम करत होता साऊथ स्टार विजय सेतुपती! वाचा अभिनेत्याबद्दल...

छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी म्हणजेच पुण्यातील वडू बुद्रुक येथे या चित्रपटाच्या पोस्टरचे लाँचिंग करण्यात आले. छत्रपती संभाजी महाराज यांची गाथा सांगणारा 'छत्रपती संभाजी' हा चित्रपट मराठी, हिंदी, तमिळ, तेलगू आणि इंग्रजी अशा वेगवेगळ्या भाषांमध्ये एकाच वेळी प्रदर्शित होणार आहे. अद्वितीय राजकरण, आक्रमक रणनीती आणि कौशल्याच्या बळावर छत्रपती संभाजी महाराजांनी निर्माण केलेला धगधगता इतिहास 'छत्रपती संभाजी' या चित्रपटातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

अभिनेते शशांक उदापूरकर यांनी ‘छत्रपती संभाजी’ या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. तर, त्यांच्यासोबतच प्रमोद पवार, रजित कपूर, दिलीप ताहिल, मृणाल कुलकर्णी, मोहन जोशी, भरत दाभोळकर, लोकेश गुप्ते, बाळ धुरी, दिपक शिर्के, अमित देशमुख, समीर, मोहिनी पोतदार, प्रिया गमरे आदी कलाकार 'छत्रपती संभाजी' चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटात दिवंगत अभिनेते आनंद अभ्यंकर यांची देखील महत्त्वपूर्ण भूमिका आहे. 'छत्रपती संभाजी' हा मराठी चित्रपट येत्या २६ जानेवारी २०२४ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Whats_app_banner
विभाग