Vijay Sethupathi Birthday: कधीकाळी सेल्समन म्हणून काम करत होता साऊथ स्टार विजय सेतुपती! वाचा अभिनेत्याबद्दल...
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Vijay Sethupathi Birthday: कधीकाळी सेल्समन म्हणून काम करत होता साऊथ स्टार विजय सेतुपती! वाचा अभिनेत्याबद्दल...

Vijay Sethupathi Birthday: कधीकाळी सेल्समन म्हणून काम करत होता साऊथ स्टार विजय सेतुपती! वाचा अभिनेत्याबद्दल...

Jan 16, 2024 07:55 AM IST

Happy Birthday Vijay Sethupathi: ना पिळदार शरीरयष्टी, ना हिरोजेनिक चेहरा... मात्र त्याच्या अभिनयासमोर या सगळ्या गोष्टी अगदीच दुय्यम ठरल्या.

Happy Birthday Vijay Sethupathi
Happy Birthday Vijay Sethupathi

Happy Birthday Vijay Sethupathi: साऊथचा सुपरस्टार, निर्माता, संवाद लेखक आणि गीतकार अशी चौफेर ओळख मिळवणारा अभिनेता विजय सेतुपती याला आजघडीला कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही. मात्र, त्याचा इथवर पोहोचण्याचा हा प्रवास अजिबात सोपा नव्हता. अभिनेता विजय सेतुपती आपल्या दमदार अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे. ना पिळदार शरीरयष्टी, ना गोरागोमटा हिरोजेनिक चेहरा, मात्र त्याच्या अभिनयाच्यासमोर या सगळ्या गोष्टी अगदीच दुय्यम ठरल्या. अभिनेता विजय सेतुपती आज (१६ जानेवारी) त्याचा ४६वा वाढदिवस साजरा करत आहे. चला तर, या निमित्ताने जाणून घेऊया त्याच्याशी संबंधित काही खास गोष्टी...

अभिनेता विजय सेतुपती याचा जन्म तामिळनाडूतील राजपालयम या छोट्याशा गावातील एका सामान्य कुटुंबात झाला. अभिनेत्याने आपलं प्राथमिक शिक्षण गावातूनच पूर्ण केलं. मात्र, तो सहावीत असताना त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने चेन्नईला स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. पुढे विजय सेतुपती याने चेन्नईच्या धनराज बेद महाविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण केलं. या सगळ्या दरम्यान त्याच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती अतिशय हालाखीची होती. अतिशय बिकट परिस्थितीत त्याचं कुटुंब आपला उदरनिर्वाह करत होतं.

Viral Video: पत्नीसमोरच ‘जेठालाल’ला विचारलं बबिता कुठे आहे? अभिनेत्याच्या उत्तरानं पिकला हशा!

कुटुंबाला आर्थिक हातभार लावता यावा म्हणून शिक्षण पूर्ण झाल्यानंतर विजयने मिळेल ते काम करण्याचा निर्णय घेतला. विजय सेतुपतीला लहानपणापासूनच अभिनयाची खूप आवड होती. मनोरंजन विश्वाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना देखील त्याने अभिनेता होण्याचं स्वप्न पाहिलं होतं. मात्र, ठेंगणी उंची आणि लूक्समुळे विजयला सुरुवातीला कुठेच अभिनयाची संधी मिळत नव्हती. अखेर कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी त्याने एका दुकानात सेल्समन म्हणून काम करण्यास सुरुवात केली. याशिवाय त्याने एका दुकानात कॅशिअरची नोकरीही केली. मात्र, इतकं सगळं करूनही आर्थिक चणचण भागत नव्हती. अखेर अधिकचे पैसे कमावण्यासाठी विजय सेतुपतीने दुबई गाठली. मात्र, परक्या देशांत कुटुंबाशिवाय जगणं कठीण वाटल्याने तो भारतात परतून आला.

भारतात परतल्यानंतर अभिनयाची आवड जपण्यासाठी विजयने चेन्नईमधला एक थिएटर ग्रुप जॉईन केला. या ग्रुपमध्ये तो अभिनय शिकायचा आणि पार्ट टाईम अकाऊंटंट म्हणून काम सांभाळायचा. याच थिएटर ग्रुपमध्ये शिकताना त्याने अभिनयाची बाराखडी गिरवली. या ग्रुपच्या माध्यमातून त्याला छोट्या मोठ्या भूमिका मिळू लागल्या. त्यानंतर विजय सेतुपतीने टीव्हीवरही भूमिका साकारायला सुरुवात केली. या दरम्यान क मोठी संधी त्याच्याकडे चालून आली. रामासामीच्या ‘तेन्मेरकु परुवकात्रु’ या चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी विजयला विचारणा झाली. विजयने मुख्य भूमिका साकारलेल्या या चित्रपटाला तीन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. या पुरस्कारांसोबतच विजयने आणखी धडाकेबाज काम करत अनेक सुपरहिट चित्रपट दिले.

Whats_app_banner