'मोरया’, ‘झेंडा’ सारख्या दमदार मराठी चित्रपटांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा अभिनेता म्हणजे संतोष जुवेकर. त्याने मराठी मालिका, चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. लाखो मुलींच्या मनावर राज्य करणारा संतोष अद्याप अविवाहित आहे. आज १२ डिसेंबर रोजी संतोषचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्याच्या खासगी आयुष्यातील काही गोष्टी...
संतोष जुवेकरचे अनेक चित्रपट हिट ठरले आहेत. त्याच्या चाहता वर्ग देखील मोठा आहे. काही दिवसांपूर्वी त्याने एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. या मुलाखतीमध्ये त्याने मित्राला आवडत असलेल्या मुलीसोबत डेटवर गेल्याचा खुलासा केला. “मी इयत्ता १० वीत असताना पहिल्यांदा डेटवर गेलो होतो. मी ठाण्यात राहतो आणि मी ज्या मुलीबरोबर डेटवर गेलो ती माझ्या मित्राला आवडायची. तो मला नेहमी सांगायचा की ती त्याला आवडते. मी त्याला वचन दिले होते की मी त्याचे आणि तिचे जूळवून देईन. पण त्याच्याशी तिच्याबद्दल बोलता बोलता मलाच ती आवडायला लागली” असे संतोष म्हणाला.
वाचा: ‘ॲनिमल’मधील इंटिमेट सीन्स पाहून तृप्ती डिमरीच्या आईवडिलांनी दिली प्रतिक्रिया
पुढे तो म्हणाला, “मी तिला विचारले आणि ती हो म्हणाली. त्यावेळेस मी १० वीत होतो. पहाटे ५ वाजता आम्ही क्लासमध्ये भेटलो. तिथे मी तिला प्रपोज केले. ती हो म्हणाली. आठवड्याभराने माझ्या नावाने एक निनावी पत्र आले. त्यात प्रचंड शिव्या होत्या. ते पत्र मला माझ्या त्या मित्राने पाठवले होते.”
संतोषने आजवर काही बॉलिवूड चित्रपटांमध्ये ही काम केले आहे. 'डार्लिंग' चित्रपटातील त्याची भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरली होती. या चित्रपटात अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता विजय वर्मा महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते. हा चित्रपट हिट ठरला होता. त्यानंतर तो ‘कुत्ते’ या चित्रपटात अभिनेते नसिरुद्दीन शहा, अर्जुन कपूर, अभिनेत्री तब्बूसह दिसला होता.
संबंधित बातम्या