बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर याच्या 'अॅनिमल' चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटामध्ये अभिनेत्री तृप्ती डिमरी हिने रणबीर कपूर याच्यासोबत काही इंटिमेट सीन्स दिले आहेत. या भूमिकेसाठी काही अभिनेत्रींने ऑडिशन दिले होते. मात्र, तृप्ती सगळ्यांना वरचढ ठरली. जेव्हा ॲनिमल चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा तृप्तीच्या आई-वडिलांनी तो पाहिला. तो पाहिल्यावर त्यांची काय प्रतिक्रिया होती हे स्वत: तृप्तीने एका मुलाखतीमध्ये सांगितले आहे
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तृप्तीने सांगितले की तिच्या आईवडिलांनी ‘ॲनिमल’ हा चित्रपट पाहिला आणि त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. रणबीरसोबतच्या इंटिमेटट सीन्स त्यांना माझ्याकडून अपेक्षित नव्हते. या विषयी बोलताना तृप्ती म्हणाली, "माझ्या आईवडिलांना जरा धक्का बसला. ते मला म्हणाले, आम्ही चित्रपटांमध्ये असे काही पाहिले नव्हते आणि तू सुद्धा अशी कोणती भूमिका साकारली नव्हतीस. त्या सीन्सच्या विचारांतून बाहेर पडण्यास त्यांना थोडा वेळ लागला. पण त्यांनी मला समजून घेतले. ते म्हणाले की तू हे सीन्स नव्हते करायचे, पण ठीक आहे. पालक म्हणून आम्हाला असे वाटणे स्वाभाविक आहे.”
वाचा: रितेश देशमुख राजकारणात येणार? देवेंद्र फडणवीसांनी दिला मोलाचा सल्ला
तृप्तीने तिच्या पालकांना समजावून सांगितले, “मी त्यांना म्हणाले की मी काहीच चुकीचे करत नाहीये. हे माझे काम आहे आणि जोपर्यंत मी कम्फर्टेबर, सुरक्षित आहे, तोपर्यंत मला असे सीन्स करण्याबद्दल काहीच समस्या नसेल. मी एक अभिनेत्री आहे आणि मला भूमिकेसाठी १०० टक्के प्रयत्न करावे लागतील. मी या चित्रपटासाठी तेच केले.”
दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांचा 'अॅनिमल' हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर गाजत आहे. अभिनेता रणबीर कपूर, बॉबी देओल, अनिल कपूर आणि रश्मिका मंदाना महत्त्वाच्या भूमिकेत असलेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी रेकॉर्ड ब्रेक कमाई केली होती. आता या चित्रपटाने ६०० कोटीचा पल्ला पार केल्याचे समोर आले आहे.
संबंधित बातम्या