मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Aruna Irani Birthday: ‘या’ कारणामुळे अरुणा इराणींनी घेतला होता कधीही ‘आई’ न होण्याचा निर्णय! वाचा अभिनेत्रीबद्दल...

Aruna Irani Birthday: ‘या’ कारणामुळे अरुणा इराणींनी घेतला होता कधीही ‘आई’ न होण्याचा निर्णय! वाचा अभिनेत्रीबद्दल...

Harshada Bhirvandekar HT Marathi
May 03, 2023 07:45 AM IST

Aruna Irani Birthday Special: रील लाईफमध्ये ‘आई’ बनणाऱ्या अरुणा खऱ्या आयुष्यात कधीच आई झाल्या नाहीत. एका कारणामुळे त्यांनी ‘आई’ न होण्याचा निर्णय घेतला होता.

Aruna Irani
Aruna Irani

Aruna Irani Birthday Special: हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री अरुणा इराणी यांनी आपल्या अभिनयाने सिनेविश्वात वेगळे स्थान निर्माण केले आहे. ७०-८०च्या दशकांत त्यांनी अनेक दमदार चित्रपट केले. विशेषत: खलनायिकेच्या भूमिकेत त्यांनी मोठा पडदा गाजवला. त्यांनी साकारलेली खलनायिका नायिकेच्याही वरचढ ठरायची. अभिनेत्री अरुणा इराणी आज (३ मे) आपला वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांनी आपल्या फिल्मी करिअरमध्ये अनेकदा आईची भूमिका साकारली आहे. मात्र, रील लाईफमध्ये ‘आई’ बनणाऱ्या अरुणा खऱ्या आयुष्यात कधीच आई झाल्या नाहीत. एका कारणामुळे त्यांनी ‘आई’ न होण्याचा निर्णय घेतला होता.

ट्रेंडिंग न्यूज

अभिनेत्री अरुणा इराणी यांचा जन्म ३ मे १९४६ रोजी मुंबईत झाला. त्यांची चित्रपट कारकीर्द तशी खूप मोठी आहे. अरुणा इराणी यांनी ३००हून अधिक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. ७०-८०च्या दशकांत मोठ्या पडद्यावर त्यांचा दबदबा होता. मोठ्या पडद्यावर त्या कधी आईच्या भूमिकेत, तर कधी सासूच्या भूमिकेत दिसल्या.

Prashant Damle: अभिनेते प्रशांत दामले यांचा ‘ब्राह्मण भूषण’ पुरस्काराने होणार सन्मान!

अरुणा इराणी यांनी फारच कमी वयात आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्यांनी वयाच्या अवघ्या ९व्या वर्षीच त्यांच्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. अरुणा इराणी यांनी 'गंगा जमुना' चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केले होते. १९६४ मध्ये आलेल्या 'जहाँ आरा' या चित्रपटाने त्यांच्या करिअरचा आलेख उंचावला. त्यांचे वैवाहिक आयुष्य देखील नेहमीच चर्चेत राहिले आहे. वयाच्या ४०व्या वर्षी त्यांनी चित्रपट दिग्दर्शक कुकू कोहली यांच्याशी लग्न केले होते.

लग्नाच्या वेळी अरुणा इराणी ४० वर्षांच्या होत्या. त्यांना आयुष्यात साथीदाराची गरज होती. त्यांना स्वतःचे घर बसवायचे होते. यादरम्यान त्यांची कुकू कोहलीची भेट झाली. मात्र, त्यावेळी कुकू यांचे आधीच लग्न झालेले होते. तरीही त्यांनी अरुणा इराणींनी त्यांच्याशी लग्न केले. १९६० साली अरुणा यांचे लग्न झाले. पण, त्यांनी कधीही आई न होण्याचा निर्णय घेतला होता. या मागे कारण होते लहान मुलांचा गोंगाट आणि गोंधळ... अरुणा त्यांचा पुतण्या आणि भाचीला गोंधळ घालताना पाहून खूप अस्वस्थ व्हायच्या. पुढे जाऊन आपल्या मुलांनी देखील असे वागू नये, हाच विचार त्यांनी केला. त्याचवेळी उशिरा लग्न झाल्याने जनरेशन गॅपमुळे तिला मूल होऊ नये, असा सल्ला डॉक्टरांनी दिला होता.

IPL_Entry_Point

विभाग