मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Prashant Damle: अभिनेते प्रशांत दामले यांचा ‘ब्राह्मण भूषण’ पुरस्काराने होणार सन्मान!

Prashant Damle: अभिनेते प्रशांत दामले यांचा ‘ब्राह्मण भूषण’ पुरस्काराने होणार सन्मान!

Harshada Bhirvandekar HT Marathi
May 02, 2023 06:42 PM IST

Brahman Bhushan award to Prashant Damle: अनेक मानाच्या पुरस्कारांवर प्रशांत दामले यांनी आपले नाव कोरले आहे. आता त्यांना ‘ब्राह्मण भूषण’ हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आहे.

Prashant Damle
Prashant Damle

Prashant Damle: चित्रपट, मालिका आणि नाटक अशी तीनही क्षेत्र गाजवणारे अभिनेते अशी प्रशांत दामले यांची ओळख आहे. काहीच दिवसांपूर्वी त्यांनी आपल्या नाट्य कारकिर्दीतील १२,५००वा प्रयोग सादर केला. अनेक मानाच्या पुरस्कारांवर प्रशांत दामले यांनी आपले नाव कोरले आहे. आता त्यांना ‘ब्राह्मण भूषण’ हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आहे. ‘आम्ही सारे ब्राह्मण’ आणि ‘ब्राह्मण व्यावसायिक पत्रिका’ यांच्या वतीने ब्राह्मण भूषण पुरस्काराचे आयोजन केले जाते. या वर्षी हा पुरस्कार सुप्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांना जाहीर करण्यात आला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

व्यावसायिक नाटकांच्या १२५००हून अधिक प्रयोगांचा टप्पा पार करणारे अभिनेते प्रशांत दामले यांनी नेहमीच प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले आहे. प्रशांत दामले यांना नुकताच राष्ट्रपतींच्या हस्ते संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार देखील मिळाला आहे. तर, टिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फे त्यांना डी. लिट पदवी देखील देण्यात आली आहे. आता याच पार्श्वभूमीवर त्यांना यंदाचा ‘ब्राह्मण भूषण पुरस्कार’ जाहीर करण्यात आल्याचे ब्राह्मण व्यावसायिक पत्रिका या नियतकालिकाचे मुख्य संपादक भालचंद्र कुलकर्णी आणि संचालक संजय ओर्पे यांनी सांगितले.

The Kerala Story: 'द केरळ स्टोरी'च्या विरोधातील याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार!

प्रशांत दामले यांना प्रदान करण्यात येणार आलेल्या या पुरस्काराचे स्वरूप मानपत्र, पुणेरी पगडी आणि उपरणे असे असणार आहे. या पुरस्कार समारंभामध्ये प्रसिद्ध मुलाखतकार राजेश दामले हे प्रशांत दामले यांची मुलाखत देखील घेणार आहेत. येत्या ६ मे रोजी सायंकाळी ५.३० वाजता पुण्यातील शिवाजीनगर येथील मॉडर्न कॉलेज सभागृहात हा पुरस्कार प्रदान सोहळा पार पडणार आहे.

या समारंभात ‘आम्ही सारे ब्राह्मण’ आणि ‘ब्राह्मण व्यावसायिक पत्रिका’ यांच्या वतीने देण्यात येणाऱ्या इतरही अनेक पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. रोख रक्कम, शाल आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्कारांचे स्वरुप असणार आहे.

IPL_Entry_Point