मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Viral Video: लाइव्ह कॉन्सर्टमध्ये गायकाने तोडली गिटार, चाहत्यांनी व्यक्त केला संताप

Viral Video: लाइव्ह कॉन्सर्टमध्ये गायकाने तोडली गिटार, चाहत्यांनी व्यक्त केला संताप

Aarti Vilas Borade HT Marathi
Apr 17, 2024 09:51 AM IST

सध्या सोशल मीडियावर एका गायकाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये त्याने लाइव्ह कॉन्सर्टमध्येच आपटून आपटून गिटर तोडली आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

Viral Video: लाइव्ह कॉन्सर्टमध्ये गायकाने तोडली गिटार, चाहत्यांनी व्यक्त केला संताप
Viral Video: लाइव्ह कॉन्सर्टमध्ये गायकाने तोडली गिटार, चाहत्यांनी व्यक्त केला संताप

लाइव्ह कॉन्सर्टमध्ये कधी काय होईल याचा नेम नसतो. कधी चाहते विचित्र वागतात तर कधी लाइव्ह कॉन्सर्टमध्ये परफॉर्म करणाऱ्या गायकांचे व्हिडीओ तुफान व्हायरल होतात. सध्या सोशल मीडियावर भारतातील एका लाइव्ह कॉन्सर्टदरम्यानचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये गायकाने चक्क कॉन्सर्ट संपल्यानंतर हातातील गिटरच फोडली आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

लाइव्ह कॉन्सर्टमध्ये गायक हे त्यांनी परिधान केलेले कपडे किंवा त्यांच्याकडे असलेल्या मौल्यवान वस्तू हे चाहत्यांना देताना दिसतात. पण सध्या एका भारतीय गायकाने असे काही केले आहे की त्याची चर्चा सातासमुद्रापार होताना दिसत आहे. या गायकाचे कृत्य सर्वांनाच खटकल्याचे स्पष्ट झाले आहे. नेटकऱ्यांनी तर या व्हिडीओवर कमेंट करत नाराजी व्यक्त केली आहे.
वाचा: 'या' उत्तराने लारा दत्ता हिने जिंकला ‘मिस युनिव्हर्स’चा ताज; परीक्षकही झाले होते थक्क

काय आहे प्रकरण?

एपी ढिल्लोंने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर कॉन्सर्टमध्ये परफॉर्म करतानाचा व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये त्याने वेगवेगळ्या रंगाचा एक टी-शर्ट परिधान केला आहे. तसेच काळ्या रंगाची पँट घातली आहे. त्याच्या बॅग्राऊंडमध्ये असलेल्या व्यक्तींनी केवळ काळ्या रंगाचे कपडे परिधान केले आहेत. एपी ढिल्लोंच्या हातात पिवळ्या रंगाचे गिटार आहे. परफॉर्मन्स झाल्यानंतर शेवटी त्याने हे गिटर आपटून आपटून तोडून टाकले आहे.
वाचा: ‘गॅलेक्सी’ अपार्टमेंटमधील 1BHK फ्लॅट सोडण्यास सलमान खान तयार का नाही? काय आहे कारण

नेटकऱ्यांनी केली टीका

सोशल मीडियावर एपी ढिल्लोंचा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी कमेंट करण्यास केल्या आहेत. एका यूजरने 'अशा गोष्टींचा आदर करा ज्यांच्यामुळे तुम्ही इथपर्यंत पोहोचले आहात. हे संपूर्ण तुझे नुकसान आहे' असे म्हणत एपी ढिल्लोंला सुनावले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने 'तुम्हाला काय वाटते असे करणे योग्य आहे का?' अशी कमेंट केली आहे. तिसऱ्या एका यूजरने गायक दिलजीत दोसांजचे उदाहरण देत 'याच कारणामुळे दिलजीत हा इतरांपेक्षा वेगळा ठरतो' अशी कमेंट केली आहे.
वाचा: अरुण गोविल आणि दीपिका चिखलीया रुपेरी पडद्यावर, राम-सीतेची लोकप्रिय जोडी 'या' मराठी सिनेमात करणार काम

कोण आहे एपी ढिल्लों?

हा गायक दुसरा तिसरा कोणी नसून एपी ढिल्लों आहे. 'ब्राउन मुंडे', 'विद यू' आणि 'समर हाई' या गाण्यांसाठी एपी ढिल्लों विशेष ओळखला जातो. त्याच्या कृतीवर अनेकदा टीका करण्यात आली आहे. आता त्याचा हा कॉन्सर्टमधला व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे तो पुन्हा नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आला आहे.

IPL_Entry_Point

विभाग