मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Khurchi Trailer Out: सत्तेच्या चक्रव्युहात कोण कोणाला घोडा लावणार? 'खुर्ची' चित्रपटाचा दमदार ट्रेलर बघाच!

Khurchi Trailer Out: सत्तेच्या चक्रव्युहात कोण कोणाला घोडा लावणार? 'खुर्ची' चित्रपटाचा दमदार ट्रेलर बघाच!

Jan 02, 2024 09:54 PM IST

Khurchi Marathi Movie Trailer Out: 'खुर्ची' या चित्रपटाची हवा सर्वत्र पाहायला मिळत आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे.

Khurchi Marathi Movie
Khurchi Marathi Movie

Khurchi Marathi Movie Trailer Out: सत्तेची लढाई दाखवणारा नवा कोरा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'खुर्ची' असे या चित्रपटाचे नाव असून, येत्या १२ जानेवारीला हा चित्रपट रिलीज होणार आहे. या आधी चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाच्या धमाकेदार ट्रेलरमध्येच कथेची झलक प्रेक्षकांना पाह्यला मिळाली आहे. छोट्याशा आर्यांचा दमदार अंदाज या ट्रेलरमध्ये पाहायला मिळाला आहे. हातात आणि गळ्यात सोन्याचे वजनदार दागिने, पांढरे कपडे आणि डोक्यावर टिळा या लूकमध्ये आर्यन अगदी छोटा राजकारणीच वाटत आहे. खुर्चीच्या या रोमांचक खेळात तो अनेक बड्या व्यक्तींना टक्कर देताना दिसणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

राजकारणात खुर्चीचं किती महत्त्व आहे आणि त्यासाठी काय काय घडू शकतं हेच या ट्रेलर मधून बघायला मिळालं आहे. या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर घोंगावणार हे सत्तेचं वादळ आता चांगलंच वाढताना दिसत आहे. येत्या १२ जानेवारी २०२४ला 'खुर्ची'चा खेळ मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहे.

Arbaaz Khan: दुसऱ्या लग्नानंतर अरबाज खाननं मलायका अरोराला केलं अनफॉलो? नेमकं सत्य काय?

'खुर्ची' या चित्रपटाची हवा सर्वत्र पाहायला मिळत आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. सत्ता, खुर्ची, खून, मारामाऱ्या आणि रक्त या सगळ्याच्या अवतीभोवती फिरणार कथानक नक्कीच प्रेक्षकांच्या मनावर ताबा मिळवेल. ट्रेलरमधील कलाकारांच्या भेदक नजरा चित्रपटाची उत्सुकता वाढवत आहे. ट्रेलरमध्ये पाहायला मिळाल्याप्रमाणे नेमकं सत्तेच्या खुर्चीवर कोण बाजी मारणार, हे चित्रपटगृहातच कळेल. या चित्रपटात राकेश बापट, अक्षय वाघमारे,आर्यन हगवणे, सुरेश विश्वकर्मा, महेश घाग, अभिनेत्री प्रीतम कागणे, कल्याणी नंदकिशोर, श्रेया पासलकर या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत.

खुर्चीसाठीची ही लढाई नेमकं कोण लढणार? चित्रपटातील सत्तेसाठीच्या या लढाईत खुर्ची कोणाला मिळणार? हे पाहणं रंजक ठरणार. 'खुर्ची’ हा जबरदस्त चित्रपट या नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात म्हणजेच १२ जानेवारी २०२४ मध्ये प्रदर्शित होणार आहे.

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग