मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  OMG 2: सेन्सॉर बोर्डने का चालवली होती ‘ओएमजी २’च्या २७ दृश्यांवर कात्री? अक्षय कुमार अखेर बोललाच!

OMG 2: सेन्सॉर बोर्डने का चालवली होती ‘ओएमजी २’च्या २७ दृश्यांवर कात्री? अक्षय कुमार अखेर बोललाच!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Oct 08, 2023 11:58 AM IST

Akshay Kumar on OMG 2: सेन्सॉर बोर्डाने तब्बल २७ कट्स लावल्यानंतर ‘ओएमजी २’ हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित करण्याची परवानगी दिली होती.

Akshay Kumar
Akshay Kumar

Akshay Kumar on OMG 2: बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमारचा ‘ओएमजी २’ हा चित्रपट आता ओटीटीवरही रिलीज झाला आहे. मात्र, आता हा चित्रपट एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. सेन्सॉर बोर्डाने तब्बल २७ कट्स लावल्यानंतर हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित करण्याची परवानगी दिली होती. यावर अक्षय कुमार मात्र इतके दिवस गप्पा बसला होता. मात्र, आता तब्बल दोन महिन्यांनंतर अक्षय कुमारने या कट्सबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. याविषयी बोलताना तो म्हणाला की, त्याला नियमांची काहीच कल्पना नव्हती आणि त्याला कुणाशीही वाद घालायचा नव्हता.

ट्रेंडिंग न्यूज

अक्षय कुमारने नुकतीच माध्यमांना एक मुलाखत दिली. यात अक्षय कुमार म्हणाला की, 'मला कुणाशीही वाद घालायचा नाही. मला या नियमांची फारशी कल्पना नाही. मला यात फार खोलात शिरायचे देखील नाही. जर, बोर्डला वाटत असेल की, हा एक प्रौढ चित्रपट आहे तर... तुम्हालाही तो प्रौढ चित्रपट वाटतो का? आम्ही हा चित्रपट अनेकांना दाखवला होता, आणि प्रत्येकाला तो खूप आवडला. मी हा चित्रपट तरुण वर्गाला नजरेसमोर ठेवून बनवला आहे आणि आता तो नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होतोय याचा मला खूप आनंद आहे.’

Israel War 2023: अभिनेत्री नुसरत भरुचाशी संपर्क झाला; लवकरच अभिनेत्री सुखरूप भारतात पोहोचणार!

अभिनेता अक्षय कुमारने याबद्दल बोलताना त्याच्या एका जुन्या चित्रपटाची आठवण देखील काढली. तो म्हणाला की, जेव्हा त्याचा ‘टॉयलेट: एक प्रेम कथा’ हा चित्रपट २०१७मध्ये प्रदर्शित झाला, तेव्हा देखील असाच गदारोळ झाला होता. सगळ्यांनी या चित्रपटाच्या शीर्षकाला बराच विरोध केला होता. तेव्हाही लोकांनी मला विचारलेलं की, तू वेडा आहेस का? तुम्हाला टॉयलेटवर फिल्म का बनवायची आहे? टॉयलेटसारख्या विषयावर चित्रपट कोण बनवतं? पण, मी तेव्हाही केवळ चित्रपटावर लक्ष केंद्रित केलं. या चित्रपटाला मिळालेलं यश सगळ्यांनाच दिसलं.

अक्षय कुमारने त्याच्या मुलाखतीत म्हटले की, ‘मला सगळ्यांना एकच गोष्ट सांगायची आहे की, माझे चित्रपट किती व्यवसाय करतील याचा विचार करू नका. या उलट मला असे चित्रपट बनवण्याची हिंमत द्या आणि आपल्या मुलांना असे चित्रपट दाखवा. समाज बदलण्याची हीच वेळ आहे. अक्षय कुमारचा ‘मिशन रानीगंज’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटाने दोन दिवसांत ७ कोटींचा व्यवसाय केला आहे.

IPL_Entry_Point

विभाग