Akshay Kumar: बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार नेहमीच काहीतरी नवीन कथानक घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येतो. त्यांच्या प्रत्येक चित्रपटात एक वेगळी गोष्ट आणि एक वेगळा थरार असतो. आता त्याचा ‘मिशन रानीगंज: द ग्रेट भारत रेस्क्यू’ हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘मिशन रानीगंज’ हा एक बायोपिक चित्रपट आहे. या चित्रपटात अक्षय कुमार याने कोल इंडियाचे इंजिनिअर जसवंत सिंह गिल यांची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात त्याने पगडी बांधूनच का भूमिका साकारली, याचं कारण त्याने नुकतंच सांगितलं आहे.