मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Javed Khan Amrohi : ‘ऑस्कर’पर्यंत धडक देणारे 'लगान' फेम अभिनेते जावेद खान अमरोही यांचं निधन

Javed Khan Amrohi : ‘ऑस्कर’पर्यंत धडक देणारे 'लगान' फेम अभिनेते जावेद खान अमरोही यांचं निधन

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Feb 15, 2023 10:00 AM IST

Javed Khan Amrohi Death : 'लगान'फेम अभिनेते जावेद खान अमरोही यांचं अल्पशा आजारानं निधन झालं आहे.

Javed Khan Amrohi
Javed Khan Amrohi

javed Khan Amrohi death news in Marathi : दूरदर्शनच्या काळातील गाजलेली मालिका 'नुक्कड'पासून ते अलीकडच्या 'लगान' व 'चक दे ​​इंडिया' अशा सिनेमांतून आपल्या कसदार अभिनयाचं दर्शन घडवणारे प्रसिद्ध अभिनेते जावेद खान अमरोही यांंचं आज निधन झालं. ते ७० वर्षांचे होते. आज दुपारी (१४ फेब्रुवारी ) त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

ट्रेंडिंग न्यूज

श्वसनाच्या आजारानं मागील वर्षभरापासून जावेद खान अंथरुणाला खिळून होते. त्यांचा हा आजार उत्तरोत्तर बळावत गेला. त्यांची फुफ्फुसे निकामी झाली होती. मुंबईतील एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचारांना यश आलं नाही. काल अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.

अमरोही यांच्या निधनामुळं बॉलिवूडसह त्यांच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. अभिनेते अखिलेंद्र मिश्रा यांनी फेसबुकच्या माध्यमातून जावेद खान अमरोही यांच्या निधनाची माहिती दिली आहे.

‘सर्वोत्कृष्ट अभिनेता, ज्येष्ठ कलाकार आणि इफ्टाचे सक्रिय सदस्य जावेद खान सरांना श्रद्धांजली,’ असं मिश्रा यानं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

दीडशेहून अधिक चित्रपटांमध्ये काम

जावेद खान अमरोही यांचा जन्म मुंबईत झाला. दूरदर्शनच्या काळापासून छोटी-मोठी कामं करत त्यांनी आपली ओळख निर्माण केली होती. नुक्कड आणि मिर्झा गालिब या मालिकांमधील त्यांच्या भूमिका संस्मरणीय ठरल्या. त्यांनी जवळपास १५० हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं होतं. चित्रपटांमध्ये ते वेगवेगळ्या भूमिकांमध्ये दिसले. विनोदी भूमिकाही त्यांनी समरसून केल्या. 'सडक २' हा त्यांनी अभिनय केलेला शेवटचा चित्रपट ठरला. या चित्रपटात आलिया भट्ट, आदित्य रॉय कपूर आणि संजय दत्त हे मुख्य भूमिकेत होते.

अकादमी पुरस्कारापर्यंत धडक देणारे अभिनेते

'लगान'मधील सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याच्या ऑस्कर पुरस्कारासाठी जावेद खान अमरोही यांना नामांकन मिळालं होतं. 'लगान'मधला त्यांचा 'जीत गए हम' हा डायलॉग संस्मरणीय ठरला आहे. अंदाज अपना अपना, फिर हेरा फेरी, कुली नंबर १, हम है राही प्यार के, लाडला अशा चित्रपटांतील त्यांच्या भूमिकांनाही रसिक प्रेक्षकांची पसंती मिळाली होती.

IPL_Entry_Point

विभाग