Ira Khan-Nupur Shikhare Wedding: बॉलिवूडचा 'मिस्टर परफेक्ट' अर्थात अभिनेता आमिर खान याची लाडकी लेक आयरा खान लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे. आयरा खान फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरे याच्यासोबत लग्नगाठ बांधणार आहे. त्याच्या लग्न सोहळ्याला सुरुवात झाली असून, अनेक कलाकार या सोहळ्यांना हजेरी लावताना दिसत आहेत. आयारा खान आणि नुपूर शिखरे येत्या नव्या वर्षात म्हणजेच ३ जानेवारी २०२४ रोजी सात फेरे घेणार आहेत. दरम्यान आता त्यांच्या केळवण सोहळ्याला सुरुवात झाली आहे. नुकतंच त्यांचं केळवण अतिशय थाटामाटात पार पडलं आहे.
आयरा आणि नुपूर येत्या ३ जानेवारीला लग्न बंधनात अडकणार आहे. दरम्यान, खान आणि शिखरे परिवारात या लग्नाची जय्यत तयारी सुरू आहे. दोघांच्याही घरी लग्नाची तयारी सुरू झाली असून, वेगवेगळे सोहळे पार पडत आहेत. आयरा आणि नुपूरची जवळची मैत्रिण, अभिनेत्री मिथिला पालकर हिने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर या लग्न सोहळ्यातील काही सेलिब्रेशनचे काही फोटो शेअर केले आहेत. आमिर खानची पूर्व पत्नी किरण राव आणि त्यांचा मुलगा आझाद राव खान देखील या सोहळ्याला उपस्थित होते.
अभिनेत्रीने एका इंस्टाग्राम स्टोरीमध्ये, आयरा आणि तिचे कुटुंब केळीच्या पानावर पारंपारिक महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घेताना दिसले आहेत. यातील एका व्हिडीओमध्ये आयरा म्हणते की, ‘माय गॉड मित्रांनो, महाराष्ट्रीयनशी मुलाशी लग्न करा आणि केळवणाचा आस्वाद घ्या. हे किती मजेदार आहे ना?’
या सोहळ्यामध्ये अनेक कलाकारांनी उपस्थिती दरवेळी होती. मात्र, आमिर खान या दिवशी कुठेच दिसला नाही. मात्र, त्याने लेक आयराच्या लग्नाबद्दल खुलासा केला होता. या बद्दल बोलताना आमिर खान म्हणाला की, 'मी तर या क्षणी देखील खूप भावुक झालो आहे. तिच्या लग्नाच्या दिवशी मी खूप रडणार आहे, हे नक्कीच आहे. माझ्या घरात तर आधीच चर्चा सुरू झाली आहे की, आमिरला त्या दिवशी खूप सांभाळा, त्याची काळजी घ्या. कारण मी खूप इमोशनल आहे. मी माझे हसू किंवा माझे अश्रू नियंत्रित करू शकत नाही.'