मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Aai Kuthe Kay Karte: अनघाचा जीव धोक्यात; देशमुख कुटुंब अरुंधतीशी तोडणार नातं! मालिकेत येणार मोठं वळण

Aai Kuthe Kay Karte: अनघाचा जीव धोक्यात; देशमुख कुटुंब अरुंधतीशी तोडणार नातं! मालिकेत येणार मोठं वळण

Harshada Bhirvandekar HT Marathi
Dec 15, 2022 12:54 PM IST

Aai Kuthe Kay Karte: एकीकडे आनंद सोहळ्यात रमलेलं देशमुख कुटुंब अचानक एका मोठ्या संकटात अडकलं आहे.

Aai Kuthe kay Karte
Aai Kuthe kay Karte

Aai Kuthe Kay Karte: छोट्या पडद्यावरची ‘आई कुठे काय करते’ ही मालिका सध्या एका मोठ्या वळणावर आली आहे. या मालिकेत आता मोठं वळण येणार आहे. अभिषेकचं सत्य समोर आल्यानंतर आता अनघाला मोठा धक्का बसला आहे. याच दरम्यान अनघाला प्रसूतीकळा देखील सुरु झाल्या. आधीच तब्येत नाजूक असलेल्या अनघाच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. अभिचं सत्य ऐकून अनघा जागीच कोसळली. त्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, आंत देशमुखांच्या घरात अशी एक घटना घडणार आहे, ज्याचं संपूर्ण खापर अरुंधतीवर फुटणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

देशमुखांच्या घरात अनघाच्या डोहाळे जेवणाचा सोहळा सुरू होता. या सोहळ्यात सगळेच आनंदाने सामील झाले होते. मात्र, या कार्यक्रमातच अरुंधतीने अभिषेकचं पितळ उघडं पाडलं. अभिषेक अनघाला सोडून दुसऱ्याच मुलीसोबत फिरत असल्याचे ऐकताच घरातील सगळ्यांचाच पार चढला. यावेळी आठ महिन्यांची गर्भवती असलेल्या अनघाला देखील मोठा धक्का बसला आहे. या धक्क्याने तिला प्रसूतीकळा सुरू झाल्या आणि ती चक्कर येऊन पडली. यावेळी अनघाला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

एकीकडे आनंद सोहळ्यात रमलेलं देशमुख कुटुंब अचानक एका मोठ्या संकटात अडकलं आहे. आधीच गर्भवती असलेल्या अनघाच्या प्रेग्नन्सीमध्ये अनेक अडथळे आहेत. त्यामुळे तिची तब्येत नाजूक असल्याने, तिला अधिक जपावे लागेल, असे डॉक्टरांनी म्हटले होते. आता मात्र अनघासह तिच्या बाळाचा जीव देखील धोक्यात आला आहे. संपूर्ण देशमुख कुटुंब रुग्णालयात असून, अनघाच्या तब्येतीची काळजी करत आहे.

मालिकेच्या येत्या भागात संपूर्ण देशमुख कुटुंब याचा दोष अरुंधतीला देताना दिसणार आहे. अनघाची आई, अनिरुद्ध, कांचन आणि अभिषेक सगळेच अरुंधतीला बोल लगावणार आहेत. तर, आता या पुढे अरुंधतीचा देशमुखांशी काहीच संबंध नाही, असे कांचन म्हणणार आहे. दुसरीकडे डॉक्टर देखील आपण अनघा आणि तिच्या बाळाला वाचवू शकलो नाही, असे म्हणणार आहेत. त्यामुळे मालिकेच्या कथानकात आता मोठा ट्वीस्ट येणार आहे.

IPL_Entry_Point