Hina Khan Dance On Besharam Rang: सध्या बॉलिवूडमध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि शाहरुख खान यांच्या ‘पठाण’ या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. या चित्रपटातील ‘बेशरम रंग’ हे गाणे नुकतेच रिलीज झाले आहे. एकीकडे या गाण्यावर जोरदार टीका होत असताना, आता टीव्ही कलाकारांनी मात्र या गाण्यावर डान्स व्हिडीओ आणि रील्स बनवायला सुरुवात केली आहे. छोट्या पडद्यावरची लोकप्रिय अभिनेत्री हिना खान हिला देखील या गाण्यावर व्हिडीओ बनवण्याचा मोह आवरला नाहीये.
सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असणाऱ्या हिना खान हिने नुकताच स्वतःचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये हिना दीपिका पदुकोण आणि शाहरुख खान यांच्या ‘बेशरम रंग’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. या गण्यावर ताल धरताना हिना खान हिने देखील दीपिका प्रमाणेच सिजलिंग ड्रेस परिधान केला आहे. या लूकमध्ये हिना खान खूप सुंदर दिसत आहे.
या व्हिडीओमध्ये हिना खान हिने शिमरी शॉर्ट ड्रेस परिधान करून आपल्या कमाल डान्स मूव्ह्स दाखवल्या आहेत. तर, तिने हलकासा मेकअप केला आहे आणि कानात लाँग इयर रिंग्स घातल्या आहेत. या लूकमध्ये हिना खान खूपच सुंदर दिसत आहे. दीपिका पदुकोण प्रमाणेच हिनाने देखील तिच्या डान्सने चाहत्यांना घायाळ केलं आहे. अभिनेत्री हिना खानचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. चाहते तिच्या या व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
‘पठाण’ चित्रपटातील ‘बेशरम रंग’ या संपूर्ण गाण्यात अभिनेत्री दीपिका पदुकोण अतिशय बोल्ड अवतारात दिसली आहे. या गण्यात तिने वेगवेगळ्या बिकिनी परिधान केल्या आहेत. तर, शाहरुखचा लूक एकदा स्वॅगी दिसत आहे. एकीकडे दीपिका पदुकोणची हॉट बॉडी आणि शाहरुख खानच्या स्वॅग लूकला चाहत्यांची पसंती मिळत आहे. तर, दुसरीकडे या गाण्यात दीपिकाने परिधान केलेल्या भगव्या बिकिनीमुळे बॉयकॉटची मागणी होत आहे.
संबंधित बातम्या