मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Amit Shah : ‘ना आरक्षण हटणार ना धर्मनिरपेक्ष शब्द’, संविधान बदलण्याच्या आरोपांवर अमित शहा संतापले

Amit Shah : ‘ना आरक्षण हटणार ना धर्मनिरपेक्ष शब्द’, संविधान बदलण्याच्या आरोपांवर अमित शहा संतापले

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Apr 20, 2024 10:15 AM IST

Amit Shah Interview: संविधानातून सेक्युलर हा शब्द भाजप काढून टाकणार असल्याचा आरोपावर गृहमंत्री अमित शहा म्हणाले, सेक्युलर हा शब्द काढण्याची गरज नाही. या देशाला धर्मनिरपेक्ष बनवण्यासाठी भाजप आग्रही आहे.

‘ना आरक्षण हटणार ना धर्मनिरपेक्ष शब्द’, संविधान बदलण्याच्या आरोपांवर अमित शहा संतापले
‘ना आरक्षण हटणार ना धर्मनिरपेक्ष शब्द’, संविधान बदलण्याच्या आरोपांवर अमित शहा संतापले (HT)

Amit Shah news update: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या दिवशी दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट सांगितले की, त्यांचा पक्ष आणि भाजप सरकार आरक्षण हटवणार नाही किंवा संविधानातून धर्मनिरपेक्ष हा शब्दही काढणार नाही. गुजरातमधील गांधीनगर जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अमित शहा म्हणाले की, काँग्रेस या प्रकारचे आरोप करून देशवासीयांची दिशाभूल करत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! गोरेगाव, मालाड, कांदिवलीमध्ये मंगळवारी पाणीपुरवठा बंद

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कॉँग्रेसच्या आरक्षण आणि धर्मनिरपक्ष संविधानातून काढणार असल्याचा आरोप केला होता. या आरोपांवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा चांगलेच भडकले. जर भाजपला राज्यघटना बदलायची असेल तर गेली १० वर्षे आम्हाला बहुमत होते, जर आम्हाला हे करायचे असते तर ते गेल्या १० वर्षात केव्हाही करू शकतो, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने बहुमताचा वापर करून कलम ३२० हटवले. नागरिकत्व सुधारणा कायदा आणला आणि तिहेरी तलाक संपवला.

Ajit Pawar : अजित पवारांची डोकेदुखी वाढणार! 'त्या' वक्तव्याची निवडणूक आयोग करणार चौकशी

राज्यघटनेतून धर्मनिरपेक्ष हा शब्द काढून टाकल्याच्या आरोपावर ते म्हणाले, "धर्मनिरपेक्ष हा शब्द काढण्याची आम्हाला गरज नाही. भारत हा धर्मनिरपेक्ष देश राहावा हा भाजपचा आग्रह आहे. त्यामुळेच आम्ही समान नागरी संहिता (यूसीसी) आणत आहोत. काँग्रेसवर आरोप करताना केंद्रीय मंत्री म्हणाले, "त्यांना (काँग्रेस) शरियाच्या नावावर देश चालवायचा आहे, त्यामुळे आम्हाला नाही तर त्यांना धर्मनिरपेक्ष बनण्याची गरज आहे."

Brahmos Missile : 'या' शेजाऱ्यानं वाढवलं चीनचं टेन्शन! करारानुसार भारतानं सुपूर्द केलं ब्राह्मोस मिसाइल

शाह यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले की, ज्या प्रकारे राहुल गांधी भाजप आरक्षण हटवणार असल्याचा चुकीचा प्रचार करत आहेत. मी स्पष्ट सांगतो की भाजप आरक्षण हटवणार नाही आणि हटवू देखील देणार नाही. काँग्रेसने बहुमताचा वापर करून अनेक चुकीचे निर्णय घेतले आहे. भविष्यातही जर त्यांचा तसे करण्याचा विचार असेल तर ते कधीही तसे करणार नाही, असेही ते म्हणाले. "जर आम्हाला संविधान बदलायचे असते तर ते आम्ही आधीच करू शकलो असतो,". शाह म्हणाले की, भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) संसदेत मिळालेल्या बहुमताचा कधीही गैरवापर केला नाही. काँग्रेसला बहुमताचा गैरवापर करण्याची सवय आहे, आम्हाला नाही."

देशातून नक्षलवाद संपवण्यासाठी सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करेल, असेही शहा म्हणाले. ते म्हणाले की, भाजपच्या वचनबद्धतेत कोणताही बदल झालेला नाही. मोदी सरकारने महिला संरक्षण कायदा आणि नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू केला. ते म्हणाले की, विरोधी पक्ष काँग्रेसकडे भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारला लक्ष्य करण्यासाठी कोणताही मुद्दा उरला नाही.

WhatsApp channel