Loksabha Explainer : विदर्भात ‘DMK’ फॅक्टर हाती लोकसभा उमेदवाराचं भवितव्य!
मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Loksabha Explainer : विदर्भात ‘DMK’ फॅक्टर हाती लोकसभा उमेदवाराचं भवितव्य!

Loksabha Explainer : विदर्भात ‘DMK’ फॅक्टर हाती लोकसभा उमेदवाराचं भवितव्य!

Apr 25, 2024 05:28 PM IST

पूर्व आणि पश्चिम विदर्भात आर्थिक विकास, भौगोलिक परिस्थिती, खाद्यसंस्कृती, हवामान, पीकपद्धती, बोलीभाषेचा लहजा अशा अनेक बाबतीत वेगळेपण दिसून येतं.

Caste equation in West Vidarbha Loksabha constituency
Caste equation in West Vidarbha Loksabha constituency

लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील एकूण आठ लोकसभा मतदारसंघात उद्या, शुक्रवारी मतदान होतय. १९ एप्रिल रोजी पार पडलेल्या लोकसभेच्या पहिल्या टप्प्यात विदर्भाच्या पूर्व भागात असलेल्या नागपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या पाच मतदारसंघात मतदान झालं होतं. उद्या, शुक्रवारी २६ एप्रिल रोजी विदर्भाच्या पश्चिम भागात असलेल्या वर्धा, अमरावती, यवतमाळ-वाशिम, अकोला आणि बुलढाणा अशा एकूण पाच लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. याशिवाय मराठवाड्यातील नांदेड, परभणी आणि हिंगोलीतही मतदान होणार आहे.

पूर्व आणि पश्चिम विदर्भात आहे अनेक बाबतीत वेगळेपण

पूर्व आणि पश्चिम विदर्भात आर्थिक विकास, भौगोलिक परिस्थिती, खाद्यसंस्कृती, हवामान, पीकपद्धती, बोलीभाषेचा लहजा अशा अनेक बाबतीत वेगळेपण दिसून येतं. विदर्भातील या दोन्ही भागात सध्या निवडणुकीत प्रचाराचे मुद्दे वेगवेगळे होते. उद्या होऊ घातलेल्या विदर्भातील पश्चिम भागातील लोकसभा मतदारसंघातील जातीची समीकरणे सुद्धा वेगवेगळी आहेत. 

अमरावती

पश्चिम विदर्भातील अमरावती हा लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीासाठी राखीव मतदारसंघ आहे. या लोकसभा मतदारसंघात राजकीय प्रभावी मानला जाणाऱ्या कुणबी मतदारांचं प्राबल्य असून हा समाज सर्व प्रस्थापित राजकीय पक्षांमध्ये विखुरलेला आढळून येतो. त्या खालोखाल येथे दलित मतदारांची संख्या असून प्रभावी घटक आहे. अमरावती मतदारसंघात १९ टक्के मुस्लिम आहेत. अटीतटीच्या लढतीत मुस्लिम मतदारांची भूमिका उमेदवाराच्या यशामध्ये यापूर्वी अनेकवेळा निर्णायक ठरलेली आहे. शिवाय मेळघाटातील आदिवासी मतदारांची संख्या मोठी आहे.

वर्धा

वर्धा लोकसभा मतदारसंघ हा अमरावती आणि वर्धा अशा दोन जिल्ह्यात पसरलेला आहे. हा मतदारसंघ एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. स्वातंत्र्यानंतर तब्बल ३८ वर्षांहून अधिक काळ येथून काँग्रेस पक्षाचे खासदार निवडून गेले होते. बजाज उद्योगसमूहाचे कमलनयन बजाज (१९५७, १९६२ आणि १९६७), माजी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री वसंत साठ्ये ( १९८०, १९८४ आणि १९८९) भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कॉम्रेड रामचंद्र  घंगारे (१९९१) यांनी वर्धा लोकसभा मतदार संघाचं यापूर्वी प्रतिनिधीत्त्व केलेलं आहे.

सध्या भाजपचे रामदास तडस हे गेली दोन टर्म वर्धा लोकसभा मतदारसंघांचे खासदार आहेत. तर त्यांच्याविरुद्ध राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार)चे अमर काळे हे मैदानात आहेत. या मतदारसंघात कुणबी मतदारांची मोठी संख्या असून त्या खालोखाल तेली समाज आहे. मात्र, असे असले तरी दलित (१४ टक्के), आदिवासी (११ टक्के) आणि मुस्लिम (६ टक्के) या समाजाचे मतदार कोणाला संधी देतात, यावर उमेदवाराच्या विजयाचे गणित अवलंबून असणार आहे. 

यवतमाळ-वाशिम

यवतमाळ-वाशिम लोकसभा मदारसंघ हा दोन जिल्ह्यांत विखुरलेला आहे. १९९९ पासून शिवसेनेच्या भावना गवळी या मतदारसंघाचं सलग प्रतिनिधीत्व करत आहेत. यंदा विद्यमान खासदार गवळी यांना डावलून शिवसेना (शिंदे) गटाने राजश्री पाटील यांना उमेदवारी दिली आहे. तर शिवसेना (ठाकरे गटा)ने माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांना उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघात कुणबी समाजापाठोपाठ बंजारा समाजाची मोठी संख्या आहे. शिवाय राळेगावमध्ये आदिवासींची मोठी संख्या आहे. यवतमाळ मतदारसंघात १३ टक्के मुस्लिमांची संख्या आहे. त्यामुळे बंजारा आणि मुस्लिम मतदाराचा कौल कुणाला मिळतो, यावर निकालाचे भविष्य निश्चित होते.

हे वाचाः 

Whats_app_banner