मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Loksabha Explainer: महाराष्ट्रात लोकसभेच्या 'या' ८ जागांवर २६ एप्रिल रोजी मतदान; आठही जागांच्या लढतींची संपूर्ण माहिती

Loksabha Explainer: महाराष्ट्रात लोकसभेच्या 'या' ८ जागांवर २६ एप्रिल रोजी मतदान; आठही जागांच्या लढतींची संपूर्ण माहिती

Apr 24, 2024 11:56 AM IST Haaris Rahim Shaikh
  • twitter
  • twitter

Loksabha election -  महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्याचं मतदान २६ एप्रिल रोजी पार पडत आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील एकूण आठ लोकसभा मतदारसंघात मतदान होत आहे. या टप्प्यातील सर्व मतदारसंघातील उमेदवारांची माहिती वाचा. 

विदर्भात सर्वाधिक चर्चेत असलेल्या अमरावती लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार नवनीत राणा आणि कॉंग्रेसचे बळवंत वानखडे यांच्या थेट लढत होत आहे. या मतदारसंघात बच्चू कडू यांच्या ‘प्रहार’ पक्षाचे दिनेश बुब रिंगणात आहेत. हनुमान चालिसा प्रकरणामुळे राज्यभरात गाजलेल्या खासदार नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र वैध असल्याचा निर्वाळा सुप्रीम कोर्टाने दिल्यानंतर त्यांना मोठा दिलासा मिळाला होता. दरम्यान, राणा यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह तर वानखडेंसाठी प्रचारासाठी राहुल गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी अमरावतीत सभा घेतल्या. 
twitterfacebookfacebook
share

(1 / 9)

विदर्भातील यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात शिवसेना (शिंदे गटा)चे उमेदवार राजश्री पाटील आणि ठाकरे गटाचे उमेदवार संजय देशमुख यांच्यात थेट लढत होत आहे. शिंदे गटाच्या विद्यमान खासदार भावना गवळी यांना पक्षाने तिकीट नाकारल्याने त्या नाराज असल्याचं बोललं जात होतं. दरम्यान, गवळी यांच्या ऐवजी शेजारील हिंगोली मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. ठाकरे गटाचे उमेदवार, माजी आमदार संजय देशमुख यांनी वर्षभरापूर्वी ठाकरे गटात प्रवेश केला होता. यवतमाळ आणि वाशिम अशा दोन जिल्ह्यात विखुरलेल्या या मतदारसंघात कोरडवाहू शेतकऱ्यांचे मोठे प्रश्न असून युती आणि आघाडीच्या उमेदवाराला मोठी कसरत करावी लागत आहे.
twitterfacebookfacebook
share

(2 / 9)

महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यातील मतदान २६ एप्रिल २०२४ रोजी पार पडणार आहे. या टप्प्यात एकूण आठ मतदारसंघात मतदान होत आहे. यात बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड आणि परभणी या मतदारसंघाचा समावेश आहे.
twitterfacebookfacebook
share

(3 / 9)

अकोला लोकसभा मतदारसंघामध्ये भाजप, कॉंग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीदरम्यान तिरंगी लढत दिसत आहे. येथे विद्यमान भाजप खासदार, माजी केंद्रीय मंत्री संजय धोत्रे यांचे चिरंजीव अनुप धोत्रे, कॉंग्रेस पक्षाचे डॉ. अभय पाटील आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर रिंगणात आहेत. प्रकाश आंबेडकर यांनी यापूर्वी दोन वेळा लोकसभेत अकोल्याचं प्रतिनिधीत्व केलेलं आहे. अकोल्यात गेल्या चार लोकसभा निवडणुकांमध्ये कॉंग्रेस आणि भारीप बहुजन महासंघ/वंचितच्या उमेदवाराच्या मतांमध्ये विभाजन होऊन त्याचा फायदा भाजपला झालेला दिसतो.
twitterfacebookfacebook
share

(4 / 9)

वर्धा लोकसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान खासदार रामदास तडस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार) गटाचे अमर काळे यांच्यात लढत आहे. अमर काळे यांना त्यांचे वडील दिवंगत शरद काळे यांच्याकडून राजकीय वारसा मिळाला. अमर हे वर्धा लोकसभांतर्गत येणाऱ्या आर्वी विधानसभेतून यापूर्वी दोनदा आमदार म्हणून निवडून आले होते. तर काळे यांचे वडील शरद काळे हे १९८५-९९दरम्यान सलग चार वेळ आमदार होते. वर्धा लोकसभा मतदारसंघाचा काही भाग अमरावती जिल्ह्यात येतो. या मतदारसंघात जातीची समीकरणे फार महत्वाची ठरतात. तडस यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा घेतली होती. तर काळे यांच्यासाठी शरद पवार यांनी दोनदा प्रचार सभा घेतली होती. शिवाय उद्धव ठाकरे आणि 'आप'चे संजय सिंह यांनीही सभा घेतली आहे.  
twitterfacebookfacebook
share

(5 / 9)

परभणीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार, शिवसेना (ठाकरे गटा)चे विद्यमान खासदार संजय जाधव आणि महायुतीचे उमेदवार, राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांच्यात थेट लढत आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर परभणीचे खासदार जाधव यांनी शिंदे गटासोबत न जाता ठाकरेंची साथ दिली होती. जानकर यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परभणीत येऊन सभा घेतली. तर संजय जाधव यांच्यासाठी उद्धव ठाकरे यांनी महिनाभराच्या काळात दोन प्रचार सभा घेतल्या आहेत. जानकर हे पश्चिम महाराष्ट्रात प्रभावी धनगर नेते मानले जातात. शरद पवार यांनी जानकर यांना 'महाविकास आघाडी'कडून माढातून लढण्याची ऑफर दिली होती. याबाबत दोघांमध्ये चर्चाही झाली होती. परंतु जानकर यांनी महायुतीची ऑफर स्वीकारत परभणीतून अर्ज भरला होता.
twitterfacebookfacebook
share

(6 / 9)

नांदेडमध्ये विद्यमान भाजप खासदार प्रतापराव चिखलीकर आणि आणि कॉंग्रेस उमेदवार वसंत चव्हाण यांच्यात थेट लढत आहे. नांदेड मतदारसंघ हा कॉंग्रेसमधून नुकतेच भाजपत गेलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा पारंपरिक गढ मानला जातो. चिखलीकर आणि अशोक चव्हाण हे एकमेकांचे राजकीय वैरी. परंतु आता खुद्द अशोक चव्हाण भाजपत गेल्यामुळे त्यांना भूमिका बदलावी लागत आहे. चिखलीकर यांच्यासाठी नरेंद्र मोदी यांनी येथे सभा घेतली. तर कॉंग्रेस उमेदवार वसंत चव्हाण यांच्यासाठी उद्धव ठाकरे यांनी सभा घेतली आहे.
twitterfacebookfacebook
share

(7 / 9)

बुलढाणा लोकसभा मतदारसंघात शिवसेना (शिंदे गटा)चे उमेदवार, विद्यमान खासदार प्रताप जाधव आणि शिवसेना (ठाकरे गटा)चे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांच्यात थेट लढत होत आहे. खेडेकर हे बुलढाण्याचे ठाकरे गटाचे संपर्कप्रमुख आहेत. बुलढाण्यात खेडेकर यांच्यासाठी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि सुषमा अंधारे यांच्या सभा घेऊन शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांना पाडण्याचं आवाहन मतदारांना केलं. या मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर हेही मैदानात आहे.
twitterfacebookfacebook
share

(8 / 9)

हिंगोली लोकसभा मतदारसंघात शिवसेना (शिंदे गटा)चे बाबुराव कदम आणि शिवसेना (ठाकरे गटा)चे नागेश पाटील आष्टीकर यांच्यात थेट लढत होत आहे. या मतदारसंघात शिंदे गटाकडून आधी विद्यमान खासदार हेमंत पाटील यांचे नाव जाहीर करण्यात आले होते. परंतु ऐनवेळी त्यांचं तिकीट रद्द करून बाबुराव कदम यांना तिकीट जाहीर करण्यात आले. हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना यवतमाळ-वाशिमची उमेदवारी देण्यात आली. दोन्ही उमेदवार मतदारसंघ पिंजून काढत असून प्रामुख्याने शेतकरी बहुल असलेल्या या मतदारसंघात शेतमालाला हमीभाव, अवकाळी पावसामुळे वारंवार होत असलेलं नुकसान या प्रमुख समस्या आहेत.
twitterfacebookfacebook
share

(9 / 9)

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज