भारतीय जनता पक्षाने आज लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत महाराष्ट्रातील एकूण २० उमेदवारांचा समावेश आहे. यात नागपूरमधून केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी, पुणे शहरातून माजी महापौर मुरलीधर मोहोळ, चंद्रपूर मधून राज्याचे वनमंत्री सुधीर मुणगंटीवार, उत्तर मुंबईतून केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांच्या नावाचा समावेश आहे. शिवाय बीड मतदारसंघातून विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांच्याऐवजी त्यांची थोरली बहिण, माजी मंत्री पंकजा मुंडे यांना तिकीट देण्यात आलं आहे.
उत्तर मुंबई मतदारसंघातून विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांचे तिकीट कापून त्यांच्याऐवजी केंद्रीय मंत्री आणि नरेंद्र मोदी यांचे विश्वासू पीयूष गोयल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. माढा मतदारसंघातून रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
नागपूर - नितीन गडकरी
पुणे - मुरलीधर मोहोळ
चंद्रपूर- सुधीर मुणगंटीवार
बीड - पंकजा मुंडे
मुंबई (उत्तर) - पीयूष गोयल
मुंबई (उत्तर पूर्व) - मिहिर कोटेचा
नंदुरबार- हिना गावित
अहमदनगर- सुजय विखे पाटील
जालना- रावसाहेब दानवे
नांदेड- प्रतापराव चिखलीकर
दिंडोरी - भारती पवार
भिवंडी- कपिल पाटील
माढा - रणजीतसिंह निंबाळकर
धुळे - सुरेश भामरे
रावेर- रक्षा खडसे
अकोला - अनुप धोत्रे
वर्धा- रामदास तडस
लातूर- सुधाकर श्रृंगारे
जळगाव - स्मिता वाघ
सांगली - संजय काका पाटील
पहिल्या आत्तापर्यंत एकूण
भाजपने २ मार्च रोजी देशभरातील एकूण १९५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. पहिल्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्र्यांच्या नावाचा समावेश होता. आज ७२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. अशाप्रकारे भाजपकडून आत्तापर्यंत एकूण २६७ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. आज महाराष्ट्रातील २० उमेदवारांसोबतच दादर व नगर हवेलीतून १, दिल्ली -२, गुजरात -७, हरियाणा - ६, हिमाचल प्रदेश - २, कर्नाटक - २०, मध्य प्रदेश - ५, तेलंगन - ६, त्रिपुरा -१ , उत्तराखंड येथील २ उमेदवारांचा समावेश आहे.
संबंधित बातम्या