मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Yuvraj Singh : युवराज सिंग बनला टी-20 वर्ल्डकपचा ब्रँड ॲम्बेसेडर, चाहत्यांमध्ये उसळली आनंदाची लाट

Yuvraj Singh : युवराज सिंग बनला टी-20 वर्ल्डकपचा ब्रँड ॲम्बेसेडर, चाहत्यांमध्ये उसळली आनंदाची लाट

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Apr 26, 2024 05:19 PM IST

yuvraj singh t20 world cup 2024 ambassador : आयसीसीने युवराज सिंग याला टी-20 वर्ल्डकप २०२४ चा ब्रँड ॲम्बेसेडर बनवले आहे.

yuvraj singh t20 world cup 2024 ambassador : युवराज सिंग बनला टी-20 वर्ल्डकपचा ब्रँड ॲम्बेसेडर, चाहत्यांमध्ये आनंदाची लाट
yuvraj singh t20 world cup 2024 ambassador : युवराज सिंग बनला टी-20 वर्ल्डकपचा ब्रँड ॲम्बेसेडर, चाहत्यांमध्ये आनंदाची लाट

yuvraj singh icc men t20 world cup 2024 ambassador : आगामी टी-20 विश्वचषक १ जूनपासून वेस्ट इंडिज आणि यूएसएमध्ये खेळवला जाणार आहे. या स्पर्धेसाठी ICC ने भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग याला ब्रँड ॲम्बेसेडर बनवले आहे. १ जून ते २९ जून या काळात या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. या वर्ल्डकपचे पूर्ण वेळापत्रक आधीच प्रसिद्ध झाले आहे.

आयसीसीच्या या खास नियुक्तीनंतर चाहत्यांमध्ये आनंदाची लाट उसळली आहे. चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून युवीचे अभिनंदन करत आहेत.

दरम्यान, टी-20 विश्वचषकाला आता फक्त ३६ दिवस उरले आहेत. यापूर्वी, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) भारतीय दिग्गज युवराज सिंगला ICC पुरुष T20 विश्वचषक 2024 चा ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्त केले आहे. २००७ मध्ये झालेल्या पहिल्या T20 विश्वचषकात युवराजने एका षटकात ६ षटकार मारण्याचा विश्वविक्रम केला होता. तसेच, त्याने भारताला पहिला टी-20 विश्वचषक जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

युवी म्हणाला, माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट

या नियुक्तीनंतर युवराज सिंग म्हणाला, माझ्याकडे टी-२० विश्वचषकातील काही चांगल्या आठवणी आहेत, ज्यात एका षटकात ६ षटकार मारल्याचा समावेश आहे, त्यामुळे याचा भाग होणे खूप रोमांचक आहे. हा आतापर्यंतचा सर्वात मोठा कार्यक्रम असेल. त्याचा एक भाग होणे ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे'.

भारत-पाक सामना न्यूयॉर्कमध्ये

युवराज पुढे म्हणाला, न्यूयॉर्कमध्ये रंगणारा भारत-पाकिस्तान सामना या वर्षीच्या जगातील सर्वात मोठ्या सामन्यांपैकी एक असणार आहे, त्यामुळे त्याचा भाग होणं आणि जगातील सर्वोत्तम खेळाडूंना एका नवीन स्टेडियममध्ये खेळताना पाहणं हा एक विशेषाधिकार आहे.

यावेळी T20 विश्वचषकात २० संघ सहभागी होणार आहेत. एकूण ५५ सामने ९ ठिकाणी आयोजित केले जातील. २९ जून रोजी बार्बाडोस येथे अंतिम सामना होणार आहे. पहिला सामना अमेरिका आणि कॅनडा यांच्यात होणार आहे.

IPL_Entry_Point