मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  LSG Vs CSK : लखनौने चेन्नईचा ८ विकेटने पराभव केला, केएल राहुलची दमदार कामगिरी

LSG Vs CSK : लखनौने चेन्नईचा ८ विकेटने पराभव केला, केएल राहुलची दमदार कामगिरी

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Apr 19, 2024 06:50 PM IST

LSG Vs CSK IPL 2024 Highlights : आयपीएल २०२४ मध्ये आज लखनौ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्स आमनेसामने होते. या सामन्यात लखनौने सीएसकेचा ८ विकेट्सनी पराभव केला.

LSG vs CSK Indian Premier League 2024
LSG vs CSK Indian Premier League 2024 (AP)

इंडियन प्रीमियर लीग २०२४ चा ३४वा सामना चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात खेळला गेला. लखनौच्या एकना क्रिकेट स्टेडियमवर लखनौ सुपर जायंट्सने चेन्नई सुपर किंग्जचा ८ विकेट्सने पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने २० षटकांत ६गडी गमावून १७६ धावा केल्या. प्रत्युत्तरात लखनौने १९ षटकांत २ गडी गमावून लक्ष्य गाठले.

ट्रेंडिंग न्यूज

१७७ धावांचा पाठलाग करताना लखनौकडून केएल राहुलने ५३ चेंडूत ८२ धावा केल्या. त्याने ९ चौकार आणि ३ षटकार मारले. डी कॉकने ४३ चेंडूत ५४ धावा केल्या. निकोलस पुरन २३ धावा करून नाबाद राहिला. स्टॉइनिस ८ धावा करून नाबाद राहिला. 

तर चेन्नईकडून मुस्तफिजुर रहमान आणि पाथिराना यांनी १-१ बळी मिळवला.

चेन्नईकडून फलंदाजीत रवींद्र जडेजाने नाबाद ५७ धावा केल्या. त्याने ४० चेंडूत ५ चौकार आणि १ षटकार लगावला. धोनीने ९ चेंडूत नाबाद २८ धावा केल्या. रहाणेने ३६ धावा केल्या. मोईन अलीने ३० धावा केल्या.

लखनौ वि. चेन्नई क्रिकेट स्कोअर

केएल राहुल बाद

वेगवान गोलंदाज मथिशा पाथिरानाने कर्णधार केएल राहुलला बाद करून लखनौला दुसरा धक्का दिला. पाथीरानाच्या चेंडूवर केएल राहुलने शानदार शॉट मारला, पण जडेजाने एका हाताने झेल घेत राहुलला बाद केले. राहुल ५३ चेंडूत ८२ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.

क्विंटन डी कॉक बाद

वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमानने क्विंटन डी कॉकला बाद करून चेन्नईला पहिले यश मिळवून दिले. डी कॉक ४३ चेंडूंत ५ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ५४ धावा करून बाद झाला. त्याने कर्णधार केएल राहुलसोबत पहिल्या विकेटसाठी १३४ धावांची भागीदारी केली. राहुल सध्या क्रीजवर असून डी कॉक बाद झाल्यानंतर निकोलस पूरन राहुलला साथ देण्यासाठी क्रीझवर आला आहे.

लखनौची चांगली सुरुवात

कर्णधार केएल राहुल आणि क्विंटन डी कॉक यांनी लखनौला चांगली सुरुवात करून दिली आणि पॉवरप्लेच्या शेवटपर्यंत सीएसकेला एकही विकेट मिळू दिला नाही. ६ षटके संपल्यानंतर लखनौने बिनबाद ५४ धावा केल्या आहेत. केएल राहुल २० चेंडूत ३४ आणि डी कॉकने १६ चेंडूत १८ धावा करून क्रीजवर आहे.

सीएसेकच्या १७६ धावा

अष्टपैलू रवींद्र जडेजाचे नाबाद अर्धशतक आणि महेंद्रसिंह धोनीच्या शानदार खेळीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्सने लखनौ सुपर जायंट्ससमोर विजयासाठी १७७ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

 चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ६ बाद १७६ धावा केल्या. सीएसकेसाठी जडेजाने ४० चेंडूत ५ चौकार आणि एक षटकाराच्या मदतीने नाबाद ५७ धावा केल्या. तर धोनीने ९ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने नाबाद २८ धावा केल्या. अजिंक्य रहाणेने ३६ धावा केल्या. गायकवाड १७ धावा करून बाद झाला. रचिनने शून्यावर विकेट गमावली. मोईनने ३० धावा केल्या.

लखनौकडून कृणाल पांड्याने २ बळी घेतले. बिश्नोई, स्टोइनिस, मोहसीन आणि यश ठाकूर यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

रवींद्र जडेजाने अर्धशतक झळकावले

रवींद्र जडेजाने अर्धशतक झळकावले आहे. ३४ चेंडूत अर्धशतक पूर्ण केल्यानंतर जडेजाने आपल्याच शैलीत आनंद साजरा केला. सीएसकेने १७ षटक संपल्यानंतर ५ बाद १२३ धावा केल्या आहेत. जडेजा ३६ चेंडूत ५३ धावा करून क्रीजवर आहे आणि मोईनने १५ चेंडूत १२ धावा केल्या आहेत.

शिवम दुबे बाद

लखनौच्या गोलंदाजांनी सीएसकेला आणखी एक धक्का देत शिवम दुबेला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. दुबे ८ चेंडूंत ३ धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतला. चेन्नईने समीर रिझवीला इम्पॅक्ट प्लेयर म्हणून मैदानात उतरवले आहे. त्याच्यासोबत रवींद्र जडेजा क्रीझवर आहे.

अजिंक्य रहाणे बाद

लखनौ सुपरजायंट्सचा फिरकीपटू कृणाल पंड्याने सलामीवीर अजिंक्य रहाणेला बाद करून सीएसकेला तिसरा धक्का दिला. रहाणे आणि जडेजा यांच्यात चांगली भागीदारी रचली जात होती, मात्र कृणालने रहाणेला बोल्ड करत ​​ही भागीदारी फार काळ चालू दिली नाही. रहाणे २४ चेंडूत ३६ धावा करून बाद झाला. सध्या जडेजा क्रीजवर उपस्थित आहे.

ऋतुराज गायकवाड बाद

वेगवान गोलंदाज यश ठाकूरने चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाडला बाद करत चेन्नईला दुसरा धक्का दिला. रहाणेसह गायकवाड सीएसकेचा डाव सांभाळत होता, पण लखनौच्या गोलंदाजाने ही भागीदारी मोडली. गायकवाड १३  चेंडूत १७ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. गायकवाड बाद झाल्यानंतर रवींद्र जडेजा क्रीझवर आला आहे.

रचिन रविंद्र शुन्यावर बाद

वेगवान गोलंदाज मोहसीन खानने सलामीवीर रचिन रवींद्रला बाद करून लखनौला पहिले यश मिळवून दिले. पहिले षटक टाकण्यासाठी आलेल्या मोहसीनने पहिल्याच चेंडूवर रचिनला बाद करून लखनौला चांगली सुरुवात करून दिली. रचिन रविंद्र शुन्यावर पॅव्हेलियनमध्ये परतला. रचीन बाद झाल्यानंतर कर्णधार ऋतुराज गायकवाड मैदानात आला.

दोन्ही प्लेइंग इलेव्हन

चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, मोईन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (विकेटकीपर), दीपक चहर, तुषार देशपांडे, मुस्तफिजुर रहमान, मथीशा पाथीराना.

लखनौ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक, केएल राहुल (विकेटकीपर/कर्णधार), दीपक हुडा, मार्कस स्टॉइनिस, निकोलस पूरन, आयुष बडोनी, कृणाल पंड्या, मॅट हेन्री, रवी बिश्नोई, मोहसिन खान, यश ठाकूर.

लखनौने टॉस जिंकला

लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. लखनौने या सामन्यासाठी संघात एक बदल केला आहे. या सामन्यासाठी लखनऊने शामर जोसेफच्या जागी मॅट हेन्रीला प्लेइंग-११ मध्ये समाविष्ट केले आहे.

तर सीएसकेने या सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल केले आहेत. या सामन्यात शार्दुल ठाकूरच्या जागी दीपक चहरला संधी देण्यात आली आहे, तर डेरिल मिशेलला बाहेर ठेवण्यात आले आहे. त्याच्या मोईन अली आज खेळणार आहे.

लखनौ वि. सीएसके हेड-टू-हेड रेकॉर्ड

लखनौने आतापर्यंत दोन आयपीएल खेळले आहेत आणि यावेळी ते तिसऱ्यांदा यात सहभागी होत आहे. जर आपण CSK आणि LSG यांच्या हेड टू हेड आकडेवारीबद्दल बोललो, तर आतापर्यंत त्यांच्यामध्ये फक्त ३ सामने झाले आहेत. यापैकी दोन्ही संघांनी एक-एक सामना जिंकला असून एका सामन्याचा निकाल लागला नाही.

लखनौ वि. सीएसके पीच रिपोर्ट

लखनौच्या पीचवर जो संघ प्रथम फलंदाजी करेल त्याचा फायदा होईल. यामुळेच केएल राहुलच्या संघाने आतापर्यंत तीनदा नाणेफेक जिंकली आहे आणि प्रत्येक वेळी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. यापैकी दोन सामने जिंकण्यात संघाला यश आले, तर एका सामन्यात पराभव पत्करावा लागला.

लखनौच्या खेळपट्टीवर गोलंदाजांसाठी खूप काही आहे आणि ते फलंदाजांना अडचणीत आणू शकतात. मात्र, फलंदाजांनी सावध खेळ केल्यास धावाही होऊ शकतात. तसेच, फिरकीपटूही आपला प्रभाव पाडतात.

IPL_Entry_Point