मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  LSG vs CSK Dream 11 Prediction : आज या खेळाडूंना तुमच्या ड्रीम इलेव्हनमध्ये स्थान द्या, मालामाल व्हाल!

LSG vs CSK Dream 11 Prediction : आज या खेळाडूंना तुमच्या ड्रीम इलेव्हनमध्ये स्थान द्या, मालामाल व्हाल!

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Apr 19, 2024 04:34 PM IST

LSG vs CSK Dream 11 Prediction : आयपीएल २०२४ मध्ये आज लखनौ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सामना रंगणार आहे. लखनौचा संघ सध्या गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे, तर चेन्नई ८ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे.

LSG vs CSK Dream 11 Prediction
LSG vs CSK Dream 11 Prediction

आयपीएल २०२४ मध्ये आज लखनौ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्ज आमनेसामने येणार आहेत. दोन्ही संघांमधील सामना संध्याकाळी लखनौच्या एकना क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी लखनौच्या संघासाठी हा सामना खूप महत्त्वाचा ठरणार आहे, कारण या मोसमात आतापर्यंत ६ सामने खेळल्यानंतर त्यांना केवळ ३ जिंकता आले आहेत, तर ३ मध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. संघ ६ गुणांसह गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे.

ट्रेंडिंग न्यूज

तर चेन्नई सुपर किंग्जने या हंगामात आतापर्यंत ६ सामने खेळले आहेत आणि ४ जिंकले आहेत. CSK८ गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. 

दरम्यान, लखनौ असो की सीएसके, दोन्ही संघांकडे तगड्या खेळाडूंची फौज आहे. अशा परिस्थितीत या सामन्यासाठी ड्रीम-इलेव्हन (Dream 11 todays match team prediction) निवडणे निश्चितच खूप कठीण काम असेल, पण येथे आम्ही तुमची काही प्रमाणात मदत करण्याचा प्रयत्न करणार आहोत.

लखनऊ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामन्यासाठी, तुम्ही तुमच्या ड्रीम इलेव्हनमध्ये यष्टीरक्षक म्हणून २ खेळाडूंची निवड करू शकता, त्यापैकी एक निकोलस पूरन आणि दुसरा KL राहुल आहे. या मोसमात आतापर्यंत दोघांची फलंदाजी चांगली झाली आहे, कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या गेल्या सामन्यात पुरनने ४५ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली होती.

राहुलच्या बॅटमधून आजवर एकही मोठी खेळी दिसली नाही तरी त्याची सुरुवात चांगली झाली आहे आणि लखनौच्या मैदानावर त्याचा रेकॉर्ड चांगला आहे.

तुमच्या ड्रीम इलेव्हनमध्ये तुम्ही अजिंक्य रहाणे, ऋतुराज गायकवाड, शिवम दुबे आणि आयुष बडोनी यांचा फलंदाज म्हणून समावेश करू शकता. लखनौच्या संथ खेळपट्टीचा विचार करता रहाणे सीएसकेसाठी अत्यंत महत्त्वाचा खेळाडू ठरू शकतो, तर गायकवाडही गेल्या काही सामन्यांत चांगलाच फॉर्ममध्ये आहे.

याशिवाय, तुम्ही शिवम दुबेला तुमच्या फॅन्टसी टीममधून बाहेर ठेवू शकत नाही, तो सतत चेन्नई सुपर किंग्जसाठी बॅटने महत्त्वाची भूमिका बजावताना दिसत आहे. 

अष्टपैलू खेळाडू म्हणून, तुम्ही मार्कस स्टॉइनिस आणि रवींद्र जडेजाला तुमच्या ड्रीम  इलेव्हनमध्ये समाविष्ट करू शकता, संथ खेळपट्टी लक्षात घेता, हे दोन्ही खेळाडू गोलंदाजीतही खूप महत्त्वाचे ठरू शकतात. तुम्ही तुमच्या संघात मथिशा पाथिराना, रवी बिश्नोई आणि मुस्तफिझूर रहमान यांचा प्रमुख गोलंदाज म्हणून समावेश करू शकता, या तिघांनीही या हंगामात आतापर्यंत चेंडूवर उत्कृष्ट फॉर्म दाखवला आहे.

या सामन्यासाठी, तुम्ही अजिंक्य रहाणेला तुमच्या ड्रीम इलेव्हनचा कर्णधार म्हणून निवडू शकता. लखनौच्या खेळपट्टीवर त्याची कामगिरी सीएसकेसाठी खूप महत्त्वाची असणार आहे. याशिवाय, तुम्ही उपकर्णधार म्हणून रवींद्र जडेजाला निवडू शकता, जो या सामन्यात चेंडू आणि बॅटने गुण मिळवून देऊ शकतो.

LSG vs CSK Dream11 Prediction

यष्टिरक्षक - केएल राहुल, निकोलस पूरन

फलंदाज - रुतुराज गायकवाड, शिवम दुबे, अजिंक्य रहाणे (कर्णधार), आयुष बडोनी

अष्टपैलू – रवींद्र जडेजा (उपकर्णधार), मार्कस स्टॉइनिस

गोलंदाज - मथिशा पाथिराना, मुस्तफिजुर रहमान, रवी बिश्नोई

IPL_Entry_Point