टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज केएल राहुलचा आज (१८ एप्रिल) ३२ वा वाढदिवस आहे. केएल राहुल सध्या आयपीएलमध्ये लखनौ सुपर जायंट्सचे नेतृत्व करत आहे. केएल राहुलने २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेतही चमकदार कामगिरी केली होती.
१८ एप्रिल १९९२ रोजी कर्नाटकात जन्मलेल्या केएल राहुलने अभिनेत्री अथिया शेट्टीशी लग्न केले. ज्याप्रमाणे केएल राहुलची फलंदाजी चमकदार आणि अप्रतिम आहे, त्याचप्रमाणे त्याची लव्हस्टोरीही खूपच मनोरंजक आणि सुपर हिट आहे.
केएल राहुल आणि अथिया शेट्टी पहिल्यांदा एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून भेटले होते. यानंतर दोघांमध्ये संवादाची मालिका सुरू झाली. दोघांमध्येआधी मैत्री झाली. नंतर मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. यानंतर २०१९ मध्ये दोघे रिलेशनशिपमध्ये आले.
मात्र, दोघांनीही रिलेशनशिपमध्ये आल्यानंतर जवळपास दीड वर्ष त्यांचे नाते सार्वजनिक केले नाही. १८ एप्रिल २०२० रोजी, म्हणजे ४ वर्षांपूर्वी, अथियाने सोशल मीडियाद्वारे पहिल्यांदा केएल राहुलला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. त्यावेळी सोशल मीडियावर फोटो शेअर करून अथियाने लिहिले की, हॅपी बर्थडे माय पर्सन.
केएल राहुल २०२१ मध्ये जेव्हा इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळण्यासाठी गेला होता, तेव्हा अथियाही त्याच्यासोबत तिथे उपस्थित होती. त्या वर्षी दोघेही अनेक ॲड शूटमध्ये एकत्र दिसले. दोघेही अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसले. यानंतर त्याच वर्षी त्यांनी रिलेशनशीपमध्ये असल्याचा खुलासा केला होता.
केएल राहुल आणि आथिया यांनी २३ जानेवारी २०२३ रोजी लग्न केले. अथियाचे वडील सुनील शेट्टी यांच्या खंडाळा फार्महाऊसवर दोघांचे लग्न झाले.
केएल राहुलचे वडील सिव्हिल इंजिनीअरिंगचे प्राध्यापक आणि मंगळुरू येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कर्नाटक (NITK) चे माजी संचालक आहेत आणि त्याची आई मंगलोर विद्यापीठात सहयोगी प्राध्यापक आहे.
केएल राहुलने २०१४ मध्ये ऑस्ट्रेलियात पहिला कसोटी सामना खेळला होता. धोनीच्या शेवटच्या कसोटी सामन्यातून त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.
त्याच वेळी, त्याने ११ जून २०१६ रोजी हरारे स्पोर्ट्स क्लब येथे झिम्बाब्वे विरुद्ध एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (ODI) पदार्पण केले. यानंतर त्याने त्याच वर्षी १८ जूनला हरारे स्पोर्ट्स क्लब येथे झिम्बाब्वे विरुद्ध T20 आंतरराष्ट्रीय (T20) पदार्पण केले.
संबंधित बातम्या