Zomato News : झोमॅटोने खाद्यपदार्थांची डिलिव्हरी करणारी प्लॅटफॉर्म फी ही २५ टक्क्यांनी वाढवली आहे. हे शुक्ल ५ रुपये प्रति ऑर्डर करून कंपनीने ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. कंपनीच्या या निर्णयामुळे ग्राहकांच्या खिशाला झळ बसणार आहे. कंपनीने तिसऱ्या तिमाहीचा आर्थिक अहवाल जाहीर करण्यापूर्वी हा निर्णय घेतला आहे. या निर्णयासोबतच झोमॅटोने इंटरसिटी लीजेंड्स फूड डिलिव्हरी सेवा देखील बंद केली आहे.
झोमॅटोने ऑगस्ट २०२३ मध्ये कंपनीचे मार्जिन वाढवण्यासाठी आणि कंपनीला नफा मिळवून देण्यासाठी २ रुपये प्लॅटफॉर्म फी सुरू केली होती. यानंतर यात वाढ करून ती ३ रुपये करण्यात आली. त्यानंतर पुन्हा त्यात वाढ करून १ जानेवारीला ते ४ रुपये करण्यात आले. यापूर्वी ३१ डिसेंबर रोजी कंपनीने प्लॅटफॉर्म फी तात्पुरती ९ रुपये केली होती.
विश्लेषकांनी सांगितले की, प्लॅटफॉर्म फी वाढीमुळे डिलिव्हरी शुल्कावरील जीएसटीचा परिणाम अंशतः कमी होईल. झोमॅटोवरुन दरवर्षी सुमारे ८५ ते ९० कोटी ऑर्डर पूर्ण केल्या जातात. सुविधा शुल्कातील प्रत्येक १ रुपये वाढीमुळे कंपनीला EBITDA वर ८५ ते ९० कोटी रुपयांचा फायदा होऊ शकतो. जो रुमारे ५ टक्के आहे. मात्र, ही वाढ सध्या काही शहरांमध्येच लागू करण्यात आली आहे.
झोमॅटोने त्यांची इंटरसिटी लीजेंड्स सेवा देखील बंद केली आहे, जी प्रमुख शहरांमधील टॉप रेस्टॉरंट्सकडून इतर शहरांतील ग्राहकांपर्यंत ऑर्डर दिली जायची. झोमॅटो ॲपवरील 'लेजेंड्स' टॅबवर क्लिक केल्यावर, ही सेवा बंद केल्याचे ग्राहकांना सांगण्यात येत असून लवकरच ही सेवा सुरू करण्याबाबत कंपनी निर्णय घेणार असल्याचा मेसेज ग्राहकांना येतो आहे.
डिसेंबर तिमाहीत, झोमॅटोच्या अन्न वितरण व्यवसायाच्या एकूण महसुलात वार्षिक ३० टक्के वाढ नोंदवली गेली. जी २ हजार २५ कोटींवर पोहोचली आहे. या कालावधीत ब्लिंकिटचा महसूल दुप्पट होऊन ६४४ कोटी रुपये झाला. झोमॅटोच्या मुख्य व्यवसायातील वाढता नफा आणि ब्लिंकिटचा वेगाने होणाऱ्या वाढीमुळे झोमॅटोच्या शेअरची किंमत देखील वाढत आहे.
झोमॅटोने वर्षभरापूर्वी ३४७ कोटींच्या निव्वळ तोट्याच्या तुलनेत १३८ कोटींचा एकत्रित नफा कामावला. कंपनीचा महसूलही गेल्या वर्षीच्या १ हजार ९४८ कोटींवरून ३ हजार २८८ कोटी पयांवर पोहोचला आहे.
झोमॅटोच्या शेअर्सच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाल्यास, या वर्षात आतापर्यंत ५१ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. गेल्या एका वर्षात याने २३६.६१ टक्के उत्कृष्ट परतावा कंपनीने ग्राहकांना दिला आहे. शुक्रवारी तो एसएसई झोमॅटोचा शेयर १८८.५० वर बंद झाला. गेल्या ५२ आठवड्यांचा उच्चांक १९९.७० रुपये आहे आणि सर्वात कमी ५३.२० रुपये ऐवढा आहे.
संबंधित बातम्या