मराठी बातम्या  /  बिझनेस  /  E challan : घरबसल्या फोनवर चेक करा ई चलान, लागतील फक्त २ मिनिटं

E challan : घरबसल्या फोनवर चेक करा ई चलान, लागतील फक्त २ मिनिटं

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Apr 16, 2023 12:15 PM IST

E challan : तुम्ही कधी ट्रॅफिकचा नियम तोडला आहे का ? कदाचित या प्रश्नाचे उत्तर नाही असे असू शकेल. कारण अनेकदा आपण घाईत, नकळत नियम तोडतो आणि त्याची कल्पनाही नसते.

E challan HT
E challan HT

E challan : तुम्ही कधी ट्रॅफिकचा नियम तोडला आहे का ? कदाचित या प्रश्नाचे उत्तर नाही असे असू शकेल. कारण अनेकदा आपण घाईत, नकळत नियम तोडतो आणि त्याची कल्पनाही नसते. याचाच अर्थ तुमच्या गाडीचा चलान कापला असेल पण त्याची माहिती तुम्हाला नसेल. कारण आजकाल सीसीटीव्हीच्या मदतीने वाहन चालकांवर नजर ठेवली जाते. त्यामुळे जर तुमच्या गाडीचा ई चलान कापला जात असेल तर तुम्ही ते आँनलाईन पद्धतीने पाहिले जाऊ शकते. त्याशिवाय ते आँनलाईनही भरले जाऊ शकते. अनेकदा ई चलान कापले जाऊनही ते दीर्घकाळ प्रलंबित राहिले तर त्यामुळे नुकसान होऊ शकते.

ट्रेंडिंग न्यूज

ई चालान स्टेट्स चेक करण्याची पद्धत

ई चालान चेक करण्यासाठी तुम्हाला ईचलानच्या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल. तिथे तुम्हाला चलान डिटेल्स चेक करावे लागेल. एक विंडो ओपन झाल्यावर तिथे चलान क्रमांक अथवा वेहिकल क्रमांक अथवा ड्रायव्हिंग लायन्सेस क्रमांक घालून प्रोसेस फाॅलो करावी लागेल. जर तुम्ही गाडीचा क्रमांक प्रविष्ट केला तर तुम्हाला चेसिस क्रमांकही घालावा लागेल. त्यानंतर कॅप्चा टाकल्यानंतर ई चलानचे डिटेल्स मिळतील.

ई चलान भरण्याची आॅनलाईन प्रोसेस

आँनलाईन ई चलान भरण्यासाठी ई चलानच्या संकेतस्थळावर गेल्यानंतर तिथे तुम्हाला पे आँनलाईन असा पर्याय दिसेल. आता ई चलान संदर्भातील एक फाॅर्म खुला होईल. त्यात तुम्ही चलान क्रमांक, वेहिकल क्रमांक आणि डीएल नंबर असे पर्याय दिसतील. तुमच्या सोईनुसार एक पर्याय निवडा. क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग, यूपीआयद्वारे तुम्ही पेमेंट करु शकतात.

 

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग