मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Car price Hiked on 1 April : बीएस ६ मुळे उडाली भंबेरी, वाहन कंपन्यांचा १ एप्रिलपासून दरवाढीचा इशारा

Car price Hiked on 1 April : बीएस ६ मुळे उडाली भंबेरी, वाहन कंपन्यांचा १ एप्रिलपासून दरवाढीचा इशारा

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Mar 23, 2023 06:17 PM IST

Car price Hiked on 1 April : येत्या १ एप्रिलपासून नवे उत्सर्जन मानांकन लागू होत आहेत. त्यामुळे या प्रमुख वाहन कंपन्यांनी वाहनांच्या किंमतींमध्ये दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा भार वाहन खरेदी करणाऱ्या ग्राहकांवर पडणार आहे.

Car price Hike HT
Car price Hike HT

Car price Hiked on 1 April : बीएस सिक्स उत्सर्जन मानदंडांचा दुसरा टप्पा १ एप्रिल २०२३ पासून लागू होणार आहे. त्यामुळेच वाहन कंपन्यांनी दरवाढीची घोषणा केली आहे.

किया इंडिया

चारचाकी वाहनांच्या सेगमेंटमध्ये, किया इंडियाने त्यांच्या आयडीईच्या किमती सुमारे २-३ टक्क्यांनी वाढवल्या आहेत. कियाने यासंदर्भात प्रसिद्धीपत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार, सोनेट, सेलटाॅस आणि कारेन्स च्या आरडीई प्रकारांची सुरुवातीची किंमत अनुक्रमे ७.७९ लाख रुपये, १०.८९ लाख रुपये आणि १०.४५ लाख रुपये असेल.

टाटा मोटर्स

टाटा मोटर्सने १ एप्रिल २०२३ पासून त्यांच्या व्यावसायिक वाहनांच्या संपूर्ण पोर्टफोलिओची किंमत पाच टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय जाहीर केला. यात कंपनीने बीएस ६ च्या दुसऱ्या टप्प्यामुळे १ एप्रिल २०२३ पासून कंपनीची व्यावसायिक वाहने महाग होतील, असे सुतोवाच केले होते.

मारुति सुझुकी

जानेवारी २०२३ मध्ये मारुती सुझुकीने त्याच्या सर्व मॉडेल वाहनांच्या किमती १.१ टक्क्यांनी वाढवल्या आहेत. वाहनांच्या उत्पादन खर्चात वाढ झाल्याने कंपनीला किंमती वाढवाव्या लागल्या आहेत. याशिवाय, कठोर आरडीई उत्सर्जन मानदंडांचे पालन करण्यासाठी सर्व मॉडेल्स अद्ययावत करण्यासाठी पावले उचलली गेली.

दुचाकी वाहनेही महागणार

दुचाकी वाहन श्रेणीत हिरोमोटोकाॅर्पने त्यांच्या विविध मॉडेल्सच्या किमतींमध्ये दोन टक्क्यांची वाढ केली आहे.

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग