मराठी बातम्या  /  बिझनेस  /  EPF Passbook : उमंग अ‍ॅपचा वापर करून ईपीएफ पासबुक कसं चेक करायचं? वाचा!

EPF Passbook : उमंग अ‍ॅपचा वापर करून ईपीएफ पासबुक कसं चेक करायचं? वाचा!

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Apr 25, 2023 04:33 PM IST

EPF Passbook : ईपीएफओच्या संकेतस्थळाला भेट न देताच ईपीएफ पासबुक पाहण्यासाठी येथे क्लिक करा

EPFO HT
EPFO HT

EPF Passbook : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) संकेतस्थळावर न जाताच उमंग अॅपच्या माध्यमातून कर्मचारी त्यांचे ईपीएफ पासबुक तपासू शकतात. यासाठी ईपीएफओ ​​सबस्क्रायबर्सकडे त्यांचा यूएएन (UAN) क्रमांक असणे आवश्यक आहे.

ट्रेंडिंग न्यूज

उमंग हे अॅप्लिकेशन अँड्रॉइड आणि आयओएसवर उपलब्ध आहे. हे आधार, राष्ट्रीय पेन्शन योजना (एनपीएस), आभा आरोग्य योजना आणि कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ) सारख्या राज्य आणि केंद्र सरकारच्या सेवांपर्यंत पोहोचण्यास मदत करते. त्याशिवाय उमंग अॅपद्वारे ऑफर केलेल्या ईपीएफओ ​​सेवांमध्ये ईपीएफ दावा स्थिती, यूएएन सक्रियकरण आणि दाव्याची स्थिती पाहता येते.

उमंग अॅपद्वारे ईपीएफ पासबूक करण्यासाठी खालील स्टेप्स फाॅलो करा

- उमंग अॅप उघडा आणि तुमच्या खात्यात लॉग इन करा.

- सर्च बारमध्ये 'EPFO' प्रविष्ट करा आणि पुढे जा

- सेवांच्या सूचीमधून 'पासबुक सर्च' निवडण्यासाठी खाली स्क्रोल करा

- आता, तुमचा यूएएन क्रमांक आणि आवश्यक तपशील प्रविष्ट करा.

- ओटीपी प्रविष्ट करा आणि रिक्वेस्ट सबमिट करा.

- 'सदस्य आयडी' निवडा आणि ई पासबूक डाउनलोड करा.

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग