मराठी बातम्या  /  बिझनेस  /  EPF Withdrawal Online: पीएफचे पैसे ऑनलाइन कसे काढावेत? जाणून घ्या पाच सोप्या स्टेप्स

EPF Withdrawal Online: पीएफचे पैसे ऑनलाइन कसे काढावेत? जाणून घ्या पाच सोप्या स्टेप्स

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Nov 23, 2022 04:25 PM IST

कोणत्याही आपातकालीन परिस्थितीतही पीएफ काढता येतो. आँनलाईन पद्धतीमध्ये पीएफ काढताना पुढील बाबींची काळजी घेणे गरजेचे आहे.

EPFO HT
EPFO HT

कर्मचारी भविष्य निधी योजना अर्थात ईपीएफ अंतर्गत जमा होणारी रक्कम ही प्रत्येक निवृत्तीवेतनधारकांच्या उर्वरित आयुष्यासाठी आधार बनते. कंपनी अथवा आस्थापनामध्ये काम करत असताना, कर्मचाऱ्याच्या खात्यात कंपनीतर्फे प्रत्येक महिन्याअंती निश्चित रक्कम जमा केली जाते. एका कंपनीतून दुसऱ्या कंपनीत जातानाही युनिव्हर्सल अकाऊ्ंट नंबर (यूएएन) कायम राहतो. हा १२ अंकी युएएन क्रमांक तुमच्या पीएफ खात्यासाठी अत्यावश्यक असतो.

कोणत्याही आपातकालीन परिस्थितीतही पीएफ काढता येतो. आँनलाईन पद्धतीमध्ये पीएफ काढताना पुढील बाबींची काळजी घेणे गरजेचे आहे.

१. ईपीएफओच्या संकेतस्थळावर जा. तुमचा यूएएन क्रमांक आणि पासवर्ड टाका. पासवर्ड विसला असाल तर ओटीपी येच्या माध्यमातून पासवर्ड रिसेट करता येईल.

२. आँनलाईन क्लेम सेक्शनमध्ये जा - पीएफ खात्यामध्ये गेल्यावर क्लेम करण्यासाठी आँनलाईन सर्व्हिस सेक्शनला जा. तिथे फाॅर्म ३१,१९,१० सी आणि १० डी उपलब्ध असतील.

३. बॅक खाते प्रविष्ट करा. - सेक्शन खुले झाल्यानंतर तुमच्या बॅक खात्याची माहिती भरा.

४. नियमांची पूर्तता - सर्व महत्त्वपूर्ण दस्तावेज भरल्यानंतर ईपीएफओच्या (EPFO) अटी आणि नियमांची पूर्तता करण्यासाठी 'प्रोसिड फाॅर आँनलाईन क्लेम ' या टॅबवर क्लिक करा.

५. पैसे काढण्याचे कारण निवडा - संकेतस्थळावरील ड्राप़डाऊन मेन्यूमध्ये पीएफ वेळेपूर्वी काढण्यासाठीचे कारण दिलेले असते. त्यापैकी एका पर्यायाची निवड करा.

६. माहिती भरा आणि संबंधित दस्तावेज भरा - पैसे काढण्याचे कारण निवडल्यानंतर, तुमच्या राहत्या घराचा संपूर्ण पत्ता टाका. त्यानंतर तुम्ही जर अँडव्हान्स क्लेम हा पर्याय निवडला असेल तर तुमचे चेकबूक अथवा पासबूकची माहिची अपलोड करा. पुढील अटी आणि नियमांची पूर्तता करुन ओटीपी व्हेरिफिकेशनसाठी प्रविष्ट करा.

७. आधार ओटीपी मिळवा - सर्व दस्तावेजांची पूर्तता केल्यानंतर आधारशी निगडित मोबाईल क्रमांकावर ओटीपी मिळेल. तो ओटीपी टाकल्यानंतर सबमिट बटनवर क्लिक करा. त्यानंतर तुमची आँनलाईन पीएफ काढण्याची प्रक्रिया पूर्ण होईल.

या सर्व टप्प्यांची पूर्तता केल्यानंतर, तुम्हाला तुमचा स्टेटस पाहण्यासाठी ई सेवा खात्यावर क्लेम स्टेटस पाहता येणार आहे. ईपीएफओ तुम्ही सादर केलेले दस्तावेज आणि आँनलाईन पीएफसाठी अपलोड केलेल्या दस्तावेजांची पडताळणी करेल. ही शहानिशा पूर्ण झाल्यानंतर पीएफमधील रक्कम तुमच्या बॅक खात्यामध्ये भरली जाईल.

WhatsApp channel

विभाग