Sinh Kanya tula vrishchik Rashi Bhavishya : आज वक्री अवस्थेतील बुध मार्गस्थ होणार असून शुक्र मेष या मंगळाच्या राशीत राशीपरिवर्तन करीत आहे. सिंह, कन्या, तूळ व वृश्चिक राशीसाठी कसा राहील आजचा दिवस. वाचा राशीभविष्य!
आज चंद्रबल अनिष्ट असल्याने नव्या योजनावर काळजीपूर्वक काम करावे लागेल. वेळेचे व्यवस्थापन गरजेचे आहे. संततीच्या आरोग्या कडे लक्ष दया. व्यापारात आर्थिक बाबतीत नुकसान होण्याची शक्यता आहे. जुनी येणी रखडतील. कर्ज प्रकरणे नामंजूर होतील. नवीन व्यापारास प्रारंभ करण्यासाठी अशुभ दिवस आहे. आर्थिक व्यवहार करताना पूर्ण सतर्क राहा. फसवणूक आर्थिक हानी संभवते. आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील. वैद्यकीय बाबीवर खर्च होईल. थोडी निराशा वादी प्रवृत्ती राहील. करियरमध्ये खूप कष्ट करावे लागतील. गुप्त शत्रू डोके वर काढतील. घरातील ज्येष्ठ व्यक्तींचे आरोग्य बिघडू शकते. स्थावर इस्टेटीचे काही प्रश्न निर्माण होऊ शकतात. कोर्टकचेरीच्या कामामध्ये अडचणी वाढतील. आपण अहंकारी वृत्तीचा त्याग करावा. जवळचे मित्र आप्तेष्ट संबंध तुटण्याची शक्यता आहे. माणसं दुरावली जातील असी वर्तणुक टाळावी.
शुभरंगः लालसर, शुभदिशाः पूर्व, शुभअंकः ०५, ०७.
आज अनिष्ट चंद्र भ्रमणात तुमच्या कडक बोलण्यामुळे जवळच्या लोकांची मने दुखावतील. कुटुंबात मुलांच्या वागण्यामुळे ताण निर्माण होईल. विद्यार्थी अभ्यासाच्या नवीन योजना राबवतील. तुमचा मुड कधी जाईल आणि कधी चिडाल याचा भरवसा राहणार नाही. मानसिक त्रास निर्माण होणाऱ्या घटना घडतील. मनात उदासिनता वाढेल. यश संपादन करण्यासाठी कोणाचा तरी आधार घ्यावा लागेल. व्यापारात नवनवीन गोष्टी पुढे येतील. प्रवासात विघ्ने निर्माण होऊ शकतात. त्यामुळे प्रवास थोडा जपूनच करावा. पत्नी जोडीदाराच्या आरोग्याची समस्या चिंतीत करणारी ठरेल. आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. आपल्या उदारपणाचा फायदा घेतला जाईल. सावधगिरी न बाळगता कोणतेही काम अंगावर घेऊ नका. नाहीतर कठीण प्रसंगाशी झगडावे लागेल. नव्या कल्पना इतरांना पटणार नाहीत. मनाविरुद्ध कार्य घडतील.
शुभरंगः हिरवा, शुभदिशाः उत्तर, शुभअंकः ०६, ०८.
आज शुक्र राशीपरिवर्तनात कुटुंबातील नाते वाईकांच्या तऱ्हेवाईक वागण्यामुळे त्रस्त व्हाल. दुसऱ्याना काही कळू न देता जेवढ्या गुप्त गोष्टी तुम्हाला करता येतील तेवढ्या करणार आहात. आर्थिक स्थिती सुधारल्यामुळे अनेक बेत ठरवाल. वडिलोपार्जित इस्टेटीचे प्रश्न बरेचसे मार्गी लागतील. बौद्धिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांनी मनोधैर्य सांभाळा. अविचारीपणा योग्य नाही. विचारा अंतीच निर्णय घ्या. वाईट मित्राच्या संगतीमुळे नुकसान होईल. आपल्या कार्यक्षेत्रात आपल्या विषयी गैरसमज पसरणार नाहीत याची काळजी घ्या. शांत चित्त ठेवणाचा प्रयत्न करा. नोकरीमध्ये सरकारी अधिकारी वरिष्ठांकडून काही त्रास जाणवेल. कर्जाचा बोजा वाढण्याची शक्यता आहे. व्यापारात आर्थिक नुकसान संभवते. उताविळ पणाने कोणत्याही गोष्टी करू नका. क्षाणिक फायद्या साठी गुंतवणुक करू नका. गुप्तशत्रुपासुन त्रास संभवतो. जोडीदारासोबत स्नेहपूर्वक वागा. प्रकृति अस्थिर राहिल. उष्णतेचे विकार उद्भवतील.
शुभरंगः भगवा, शुभदिशाः पश्चिम, शुभअंकः ०२, ०७.
आज चंद्र बलवान असल्याने एखाद्या गोष्टीचा लाभ मिळेल असं वाटत असेल तर योग्य मार्गाचा अवलंब केल्यास फायदा होईल. तुम्ही करीत असलेल्या कामाची पावती तुम्हाला मिळेल. महत्त्वाच्या कामाची जबाबदारी अंगावर घेऊन पार पाडण्याची कुवत आज दाखवून द्याल. आर्थिक आघाडी वर प्रगती होईल. मनातील योजना पार पाडता येणार आहेत. तशी काही आर्थिक तरतूद होणार आहे. मोठ्या व्यवहारात आर्थिक फसवणुक होणार नाही याची सावधानी बाळगा. अर्थिक कामात चांगले यश लाभेल. आपल्याला जोडीदाराची उत्तम साथ लाभणार आहे नोकरी व्यापारात कामाचा विस्तार वाढणार आहे. संततीकडून काही चांगल्या गोष्टी प्राप्त होतील. संततीची बौद्धिक प्रगती पाहून समाधान लाभेल. स्वभावातील रागीटपणावर मात्र नियंत्रण ठेवा. निर्माण होईल. कुटुंबापासुन वेगळे राहण्याचे प्रसंग येतील
शुभरंगः नांरगी, शुभदिशाः दक्षिण, शुभअंकः ०१, ०५.
संबंधित बातम्या