Mesh Vrishabh Mithun kark horoscope : मेष राशीच्या लोकांचा अनाठायी खर्च होईल! वाचा चारही राशींचे भविष्य!
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Mesh Vrishabh Mithun kark horoscope : मेष राशीच्या लोकांचा अनाठायी खर्च होईल! वाचा चारही राशींचे भविष्य!

Mesh Vrishabh Mithun kark horoscope : मेष राशीच्या लोकांचा अनाठायी खर्च होईल! वाचा चारही राशींचे भविष्य!

Updated Apr 25, 2024 11:02 AM IST

Aries Taurus Gemini Cancer rashi bhavishya 25 April 2024 : मेष, वृषभ, मिथुन व कर्क या राशीचक्रातील पहिल्या ४ राशीसाठी आजचा दिवस कसा जाईल, जाणून घ्या राशीभविष्य.

मेष, वृषभ, मिथुन व कर्क
मेष, वृषभ, मिथुन व कर्क

Mesh Vrishabh Mithun kark horoscope : आज चंद्र तूळ राशीत संक्रमण करणार आहे. मेष, वृषभ, मिथुन व कर्क या चारही राशीसाठी आजचा दिवस कसा जाईल, वाचा राशीभविष्य.

मेष: 

आजचं चंद्रबल पाहता मनात एक प्रकारची खिन्नता राहणार आहे. प्रयत्नांची आणि कष्टाची पराकाष्ठा करावी लागेल. कुटुंबातील सदस्याच्या आजारपणाने त्रासुन जाल. खर्चाने मन व्यथित होईल. मनात चिडचिडेपणा वाढणार आहे. प्रवास करताना काळजी घेणे आवश्यक आहे. शक्यतो प्रवासाच टाळा. जर शक्य नसेल तर योग्य ती काळजी घ्या. तुमच्या नवीन योजनांना दाद मिळेल. परदेशगमनाच्या संधी मिळतील. सर्व कामे एकट्याने करणे शक्य नसल्यामुळे इतरांवर विश्वास ठेवणे भाग पडेल. धंद्यामध्ये अनेक स्पर्धक निर्माण होतील. नोकरी धंद्याच्या ठिकाणी हवे तसे वातावरण मिळाल्यामुळे काम करण्याचा उत्साह वाढेल. धाडसी निर्णय अंगलट येऊ शकतात. नास्तिकता वाढीस लागेल. अनाठायी खर्च होईल. मित्रमैत्रिणींची जपून निवड करावी. नातेवाईकांशी पटणार नाही. व्यापारात उत्पन्न कमी खर्च अधिक होईल. आनंदावर विरजण पडण्या सारख्या घटना घडतील.

शुभरंगः तांबूस, शुभदिशाः दक्षिण, शुभअंकः ०५, ०८.

वृषभ: 

आज चंद्राचं शुक्राच्या राशीतुन होणारं भ्रमण पाहता व्यापारात वेळेवर घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील. भागीदारीत अपेक्षित लाभाचे योग आहेत. स्थावर मालमला संपत्तीचे प्रश्न मार्गी लागेल. स्वसंपादिन धनाचा उपभोग घ्याल. प्रेमप्रकरणात मात्र फसगत होण्याची शक्यता आहे. क्रिडाक्षेत्रातील व्यक्तिंना योग्य संधी चालून येतील. घर खरेदीची शक्यता आहे. कुटुंबातील वातावरण उत्साही राहणार आहे. जुने मित्र सहकारी भेटतील. व्यवसाया निमित्त प्रवास होईल. मिळालेले लाभ योग्य पद्धतीने उपयोगात आणावेत. व्यवसायात आपल्या कामाच्या पद्धतीत बदल कराल. गोड बोलण्यावर भर ठेवाल. तुम्ही स्वत: ज्या गोष्टींचे चिंतन कराल त्यातून भरीव काहीतरी निर्माण करून फायदे मिळवाल. जोडीदाराशी जुळवून घ्यावे लागेल. उच्च शिक्षणाच्या अभ्यासात जास्त लक्ष घालाल. आनंददायी वातावरण राहील. 

शुभरंगः गुलाबी, शुभदिशाः आग्नेय, शुभअंकः ०४, ०८.

मिथुन: 

आज व्यातिपात योगात सामाजिक कार्यात भाग घ्याल. नवीन योजनेस प्रारंभ करण्यास उत्तम दिवस आहे. खर्चावर मात्र नियंत्रण ठेवा. चैनीच्या वस्तू घेण्याकडे ओढा राहिल. विद्यार्थ्यांना साहित्य वाचनाची आवड निर्माण होईल. प्रेमप्रकरणात अनुकूलता येईल. कुटुंबातील सदस्याचे आजारपण असेल तर प्रकृतीत सुधारणा होईल. खर्चावर नियंत्रण ठेवा. नोकरीत योग्य संधी न मिळाल्यामुळे तर्कशुद्ध विचारांचा मागोवा घ्यावा लागेल. घरातील लोकांना तुमचे विचार योग्य तऱ्हेने पटवून द्याल. कामाला जास्त महत्त्व द्याल. खूप नकारात्मक विचार मनात येतील. त्यांना सकारात्मक बनवलेत तर कामे पुढे जातील. मनावरचा ताण बर्‍या पैकी कमी झालेला असेल. सहकुटुंब प्रवासाचा बेत आखाल. कौटुंबिक पातळीवर जोडिदाराचं चांगले सहकार्य मिळणार आहे. त्यांच्या मदतीने महत्त्वाचे निर्णय घेणे निश्चित शक्य होईल. 

शुभरंगः पोपटी, शुभदिशाः उत्तर, शुभअंकः ०३, ०९.

कर्क: 

आज चंद्राची स्थिती लक्षात घेता व्यापारात बदल होण्याची शक्यता आहे. उद्योग व्यवसायातील मंडळीना नवीन प्रकल्प हाती येतील. आपल्याला केलेल्या कामाचे सकारात्मक परिणाम दिसतील. व्यापारात आर्थिकवृद्धी होईल. भागीदारा कडून सहकार्य लाभेल. आपणास मुशाफिरीत लाभ होईल. महत्वाच्या कामानिमित्त प्रवास घडतील. त्यातून आर्थिक लाभ होईल. कौटुंबिक सौख्य उत्तम राहिल. नवीन स्थावर मालमत्ता खरेदी करण्याचे योग आहे. कुटुंबात शुभवार्ता मिळेल. योग्य वेळी योग्य निर्णय घ्या. एक प्रकारचा उत्साह अंगी संचारेल. व्यवसायात साम दाम दंड भेद या नीतीने वागून तुम्ही ठरवलेले उद्दीष्ट पूर्ण कराल. बोलण्याची हातोटी चांगली असल्यामुळे तुमच्या बोलण्याची छाप इतरांवर पडेल. घरातआणि घराबाहेर उत्साहाचे आनंदी वातावरण राहील. एखादी मोठी गुंतवणक करण्यासाठी दिवस चांगला आहे. कार्यक्षेत्रात नाविन्यपूर्ण प्रयोग कराल. उतावीळपणावर आवर घालावा. 

शुभरंगः पांढरा, शुभदिशाः वायव्य, शुभअंकः ०४, ०७.

Whats_app_banner