मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Sinh Kanya Tula Vrishchik : सिंह राशीच्या लोकांना होणार शुक्रादित्य योगाचा विशेष लाभ! वाचा चारही राशींचे राशीभविष्य

Sinh Kanya Tula Vrishchik : सिंह राशीच्या लोकांना होणार शुक्रादित्य योगाचा विशेष लाभ! वाचा चारही राशींचे राशीभविष्य

Priyanka Chetan Mali HT Marathi
May 10, 2024 09:30 AM IST

Leo, Virgo, Libra, Scorpio rashi prediction 10 May 2024 : आज शुक्रवार १० मे रोजी मालव्य राजयोग, शुक्रादित्य राजयोग, रवी योग यांसारखे अनेक शुभ योग जुळून येत आहेत. वाचा सिंह, कन्या, तूळ व वृश्चिक चारही राशींचं आजचं भविष्य.

सिंह, कन्या, तूळ व वृश्चिक
सिंह, कन्या, तूळ व वृश्चिक

Sinh Kanya tula vrishchik Rashi Bhavishya : आज अक्षय तृतीयेदिवशी चंद्र आणि सूर्य आपल्या उच्च राशीत विराजमान असणार आहेत. त्यामुळे आज मालव्य राजयोग, शुक्रादित्य राजयोग, रवी योग यांसारखे अनेक शुभ योग जुळून येत आहेत. या शुभ योगांचा परिणाम बाराही राशींवर झालेला दिसून येणार आहे. सिंह, कन्या, तूळ व वृश्चिक राशीसाठी कसा राहील आजचा दिवस. वाचा राशीभविष्य!

सिंह

साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक असलेला अक्षय तृतीयेचा शुभ मुहूर्त सिंह राशीसाठीसुद्धा शुभ ठरणार आहे. आजच्या दिवशी केलेली एखादी आर्थिक गुंतवणूक फायदेशीर ठरेल. अनुकूल अनपेक्षित लाभदायक घटना घडतील. कित्येक दिवसांपासून करत असलेल्या मेहनतीचे फळ मिळण्याचा योग आहे.परंतु भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका. विचारपूर्वक पाऊले उचला. आज गुंतवणुकीसाठी दिवस अत्यंत शुभ आहे. आर्थिक स्त्रोत वाढेल. नवीन वाहन खरेदीस चांगला दिवस आहे. मानसिक मनोबल वाढेल.दिवसभरात अनेक शुभ घटना घडत असल्याने आत्मविश्वास वाढेल. मन प्रसन्न राहील. वैवाहिक आयुष्य आनंदी राहणार आहे. जोडीदारासोबत सुसंवाद होऊन नाते अधिक घट्ट होईल.

शुभरंग: लाल शुभदिशा: पूर्व.शुभअंकः ०१, ०५.

कन्या

कन्या राशीसाठी आजचा दिवस संमिश्र फलदायी असणार आहे. कामाच्या ठिकाणी उत्तम कार्य करत वरिष्ठांची वाहवाह मिळवाल. करियरमध्ये महत्त्वाच्या संधी प्राप्त होतील. कामाचे उत्तम नियोजन खूप उपयोगी पडेल. कोणतेही कार्य करताना इतरांवर विसंबून राहू नका. घरातील ज्येष्ठ व्यक्तींचे ऐकावे लागेल. आपण केलेल्या कष्टाचे चीज होईल. ऊर्जादायी आणी प्रचंड उत्साहपूर्ण दिवस असेल. महत्वाची कार्ये आजच पूर्ण करा. उद्यावर ढकलल्यास अडचणी निर्माण होऊ शकतात. स्पर्धा परिक्षा मुलाखती मध्ये यश मिळेल. मागील केलेल्या कामात यश मिळेल.अनेक दिवसांपासून अडकून असलेली जुनी देणी येतील. कमाईचे नवे मार्ग खुले होतील.

शुभरंग: पोपटी शुभदिशा: उत्तर.शुभअंकः ०३, ०६.

तूळ

आज शुक्रवार अक्षय तृतीयेचा दिवस तूळ राशीच्या लोकांसाठी सकारत्मक स्वरुपाचा असणार आहे. कामकाजात वेळेवर घेतलेले निर्णय फायदेशीर ठरणार आहेत. एखादा मोठा आर्थिक व्यवहार होण्याची शक्यता आहे. कुटुंबाकडे दुर्लक्ष करू नका. वारसाहक्काने सांपत्तिक मदत मिळेल. व्यावसायिकांना भागीदारीत लाभ होतील. आपल्या तार्किक बुद्धीने प्रतिस्पर्ध्यावर विजय मिळवाल. स्वसंपादित धनाचा उपभोग घ्याल. मौल्यवान वस्तुची खरेदी कराल. मित्रमैत्रिणीत स्नेह वाढेल. इतरांवर तुमचा प्रभाव राहील. कामानिमित्त प्रवास घडून येईल. प्रवासादरम्यान महत्वाच्या गोष्टी कानी पडतील. कौटुंबिक संबंध चांगले राहतील. धार्मिक स्थळाला भेटी द्याल.

शुभरंग: गुलाबी शुभदिशा: वायव्य.शुभअंकः ०३, ०४.

वृश्चिक

वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस उत्तम असणार आहे. उद्योग व्यवसायात नविन विचार नवीन विषय पुढे येतील. आर्थिकदृष्या दिवस खूपच उत्तम आहे. वेगवेगळ्या मार्गाने धनलाभ होतील.नवे मित्रमैत्रिणी भेटतील. नवीन वास्तु खरेदी करण्याबाबतचा विचार आग्रहाने पुढे येईल आणि निर्णयही घेतला जाईल. तुमच्या मुलांसाठी आजचा दिवस उत्सहाचा असेल. प्रवासाचे योग घडतील. कुटुंबातील सुखद वातावरणात वृद्धी होईल. आज दीर्घकालीन गुंतवणूक नक्की करावी भविष्यात ही गुंतवणुक आपणास फायदेशीर ठरेल. आज तुमच्या हातून दानधर्मासारखे पुण्य कार्य घडतील. अध्यात्मिक गोष्टींमध्ये मन रमेल.

शुभरंग: तांबूस शुभदिशा: दक्षिण.शुभअंकः ०७, ०९.

WhatsApp channel