Mesh Vrishabh Mithun kark horoscope : आज शुक्रवार १० मे २०२४,आज हिंदू धर्मातील अत्यंत शुभ अशी मान्यता असणारा अक्षय्य तृतीयेचा दिवस आहे. अक्षय्य तृतीया म्हणजे साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त आहे. आजच्या दिवशी ग्रह-नक्षत्रांच्या बदलांमुळे अनेक शुभ योग घटित होत आहेत. हे योग राशीचक्रातील सर्वच राशींवर कमी-अधिक प्रमाणात शुभ परिणाम करत आहेत. पाहूया मेष,वृषभ,मिथुन आणि कर्क राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे.
आज अक्षय तृतीयेचा दिवस मेष राशीसाठी उत्तम असणार आहे. आज तुमच्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तीची भेट घडून येईल. त्यांचे मार्गदर्शन भविष्यसाठी फायदेशीर ठरेल. नोकरीत मोजकेच काम करा पण ते बिनचूक असल्याची खात्री करा. अथवा पदरी काहीच पडणार नाही. पैशाबाबत काटेकोर राहाल आणि इतरांनीही तसे राहावे अशी तुमची इच्छा असेल. कामानिमित्त प्रवास करावा लागेल. प्रवासातून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. नोकरदार जर नोकरी बदलाचा विचार करीत असाल तर उत्तम योग आहे. तुमच्या मनोकामना पूर्ण करणारा दिवस आहे. त्याच बरोबर लाभाची मोठी संधी प्राप्त होईल.आर्थिक गुंतवणूक करण्यास आजचा दिवस शुभ आहे.परदेशवारी करण्याचा योग जुळून येईल. दिवसभर मन प्रसन्न राहील. घरातील वातावरण खेळीमेळीचे राहील.
शुभरंग: केशरी शुभदिशा: दक्षिण.शुभअंकः ०७, ०९.
अक्षय तृतीयेदिवशी तयार होणारा अतिगंड योग वृषभ राशीसाठी फारसा खास नसेल. कोणत्याही गोष्टीचा लाभ होण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. पैसे मिळाले तरी खर्चही तितकेच वाढणार आहेत. मनमानी करुन काम करण्याच्या पद्धतीमुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. मनाप्रमाणे कामे घडतलीच असे नाही. अनेपक्षित नुकसान देखील होऊ शकते. महत्वाची कामे करण्यास प्रतिकुल दिवस असल्याने शक्यतो टाळा. काही नवीन प्रश्न निर्माण होऊ शकतात. मनावर संयम ठेवून वाटचाल करावी. कामाचा ताणतणाव राहील. व्यापारात आर्थिक बाबतीत नुकसान संभवते. विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे दुर्लक्ष केल्यास महत्वाच्या संधी हातातून निसटण्याची शक्यता आहे. राजकीय क्षेत्रातील लोकांना आज लोकांच्या नाराजीला तोंड द्यावे लागेल. एकंदरीत आजचा दिवस वृषभ राशीसाठी काहीसा त्रासदायक असणार आहे.
शुभरंग: पांढरा, शुभदिशा: आग्नेय.शुभअंकः ०२, ०७.
मिथुन राशीसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. या राशीतील लोकांना जोडीदाराचे सहकार्य लाभल्यामुळे मन प्रसन्न राहील. आत्मसन्मान वाढीस लागेल. सामाजिक क्षेत्रातील व्यक्तीना आजचा दिवस प्रगतीकारक आहे. अनुकुल घटना घडतील. मन प्रसन्न असल्याने तुमच्या नियोजीत कामात वेग येणार आहे. नोकरी व्यवसायात समाधानकारक प्रगती राहील. तीर्थक्षेत्री जाण्याचा योग आहे. अध्यात्मिक रुची वाढेल. विद्यार्थ्यांची अभ्यासाची प्रगती उत्तम राहील. व्यवसायात भागीदारीमुळे आर्थिक धनलाभ होतील.
शुभरंग: हिरवा शुभदिशा: उत्तर.शुभअंकः ०३, ०६.
आज चंद्राचे रोहिणी नक्षत्रातून संक्रमण होणार आहे. त्याचा परिणाम कर्क राशीवरसुद्धा दिसून येणार आहे. आज राशीतील लोकांना आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी इतरांची मदत घ्यावी लागणार आहे. वारसा हक्कातून मिळणारी संपत्ती वास्तुविषयी कामे सुरुळित पार पडणार आहेत. तुमच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळेल. साहित्यिक समारंभात भाग घ्याल. मनात उर्जा आणि उत्साह वाढेल. वाहन घर खरेदीसाठी दिवस शुभ आहे. सर्वच स्तरातील नाते संबंधात स्नेह निर्माण होईल. प्रेमसंबंधामध्ये जोडीदाराबद्दल प्रेम भावना वाढेल. व्यापारी वर्गास मोठे व्यवहार फायदेशीर ठरतील. आजच्या दिवशी विशेष फायदा होण्याचे योग आहेत.
शुभरंग: पांढरा शुभदिशा: वायव्य.शुभअंकः ०१, ०८.
संबंधित बातम्या