अक्षय्य तृतीया ही वैशाखच्या शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या दिवशी साजरी केली जाते. देशाच्या अनेक भागात या अक्षय्य तृतीयेला 'अखाजी किंवा आखातीज' असेही म्हणतात. वर्ष २०२४ ला अक्षय्य तृतीयेच्या दिवशी पंचांगानुसार कोणत्या शुभ मुहूर्तावर पूजा करावी, चला जाणून घेऊया.
अक्षय तृतीयेचे माहात्म्य-
अक्षय तृतीयेच्या शुभ दिवशी कोणतेही काम केल्यास कामाला शुभ लाभ मिळतो. अक्षय्य तृतीयेला जे केले जाते ते आयुष्यभर अबाधित राहते. या दिवशी जप, यज्ञ, पितृ तर्पण, दान, पुण्य ही कामे करणे शुभ असते. अक्षय्य तृतीया हा हिंदू धर्मग्रंथानुसार विवाहाचा प्रस्ताव ठेवण्यासाठी एक शुभ दिवस आहे.
अक्षय्य तृतीया शुभ मुहूर्त-
पंचांगानुसार अक्षय तृतीया शुक्रवारी १० मे रोजी साजरी होत आहे. ही तिथी मुळात रोहिणी नक्षत्रातील वैशाख शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या दिवशी येते. त्या हिशोबानुसार अक्षय्य तृतीया शुक्रवारी पडत आहे. शुक्रवारी अक्षय्य तृतीया पहाटे ४ वाजून १७ मिनिटांनी सुरू होत आहे. तर ११ मे रोजी पहाटे २ वाजून ५० मिनिटांनी तृतीया तिथी समाप्त होईल.
अक्षय्य तृतीया पूजेचा शुभ काळ -
अक्षय्य तृतीया पूजेचा शुभ मुहूर्त १० मे रोजी पहाटे ५ वाजून १३ मिनिटांनी सुरू होईल तर पूजेचा शुभ मुहूर्त शुक्रवार १० मे रोजी रात्री ११ वाजून ४३ मिनिटापर्यंत राहील.
लाभ चौघडीया – पहाटे ६ वाजून ४ मिनिटे ते ७ वाजून ३७ मिनिटापर्यंत.
अमृत चौघडीया – सकाळी ७ वाजून ३७ मिनिटे ते ९ वाजून ११ मिनिटापर्यंत.
शुभ चौघडीया – सकाळी १० वाजून ४५ मिनिटे ते दुपारी १२ वाजून २० मिनिटापर्यंत.
चर चौघडीया – दुपारी ३ वाजून २७ मिनिटे ते सायं ५ वाजून १ मिनिटापर्यंत.
लाभ चौघडीया – सायं ४ वाजून ५९ मिनिटे ते ६ वाजून ३३ मिनिटापर्यंत.
शुभ चौघडीया – रात्री ८ वाजून २ मिनिटे ते ९ वाजून २७ मिनिटापर्यंत.
अमृत चौघडीया – रात्री ९ वाजून २७ मिनिटे ते १० वाजून ५४ मिनिटापर्यंत.
अक्षय्य तृतीयेचा माहात्म्य-
परशुराम जयंतीही अक्षय्य तृतीयेच्या दिवशी येते. हिंदू धर्मानुसार या दिवसापासून त्रेतायुग सुरू होते. या दिवशी सोने खरेदी करणे अनेकांसाठी शुभ असते. या दिवशी घरी आणलेली कोणतीही वस्तू नष्ट होत नसल्याने या दिवशी सोनेसह कोणतिही वस्तू खरेदी करण्याला महत्त्व आहे. या दिवशी पितृतर्पण खूप शुभ मानले जाते.
अक्षय्य तृतीया पूजेची वेळ आणि शुभ योग-
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी १० मे रोजी सकाळी ५ वाजून १३ मिनिटे ते ११ वाजून ४३ मिनिटापर्यंत पूजेची वेळ आहे. या काळात तुम्ही काही केले तर तुम्हाला यश मिळेल.
या दिवशी रोहिणी नक्षत्रात अतिगंड योग, गजकेसरी योग आणि धन योग तयार होत आहेत. या दिवशी मेष राशीमध्ये सूर्य आणि शुक्राचा संयोग आहे. तसेच मीन राशीमध्ये मंगळ आणि बुध यांच्या संयोगामुळे धन योग तयार होत आहे आणि शनी मूळ त्रिकोणी कुंभ राशीत असल्यामुळे शश राजयोग तयार होत आहे. अशा प्रकारे अक्षय्य तृतीयेला अनेक राजयोगांची निर्मिती हा शुभ संयोग घडवून आणत आहे.