मराठी बातम्या  /  धर्म  /  Shiv Jayanti : आज छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती, जाणून घ्या त्यांचे प्रेरणादायी विचार

Shiv Jayanti : आज छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती, जाणून घ्या त्यांचे प्रेरणादायी विचार

Priyanka Chetan Mali HT Marathi
Mar 28, 2024 11:26 AM IST

Shiv Jayanti 2024 : हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या आपल्या लाडक्या राजाची जयंती आज जयंती, महाराष्ट्रामध्ये तिथी आणि तारखेनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली जाते. यश मिळवण्यासाठी जाणून घ्या त्यांचे खास प्रेरणादायी विचार.

छत्रपती शिवाजी महाराज जयंती
छत्रपती शिवाजी महाराज जयंती

अवघ्या देशाचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची आज तिथीनुसार जयंती आहे. मराठा साम्राज्याची स्थापना करणाऱ्या शिवाजी महाराजांचा जन्म १६३० मध्ये शहाजी भोसले आणि जिजाबाई यांच्या पोटी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहराजवळ झाला होता. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्माच्या अचूक तारखेबद्दल विद्वानांची दोन भिन्न मते आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० म्हणजेच फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ रोजी झाला. काही जण तारखेनुसार तर काही जण तिथीनुसार शिवजयंती साजरी करतात. एक शिवजयंती १९ फेब्रुवारी रोजी तर दुसरी शिवजयंती तिथीनुसार साजरी केली जाते.

शिवाजी महाराजांचे विचार आणि त्यांची शौर्यगाथा घराघरात पोहचावी यासाठी शिवजयंती साजरी करण्यात आली. तेव्हापासून शिवजयंती मोठ्या प्रमाणात सर्वत्र साजरी होत आहे. जाणून घ्या त्यांचे प्रेरणादायी विचार.

छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रेरणादायी विचार

कोणतेही काम करण्यापूर्वी, 

त्याच्या परिणामांचा विचार करणे गरजेचे आहे; 

कारण आपली भावी पिढी तेच अनुसरत आहे.

जो माणूस काळाच्या दुष्ट वर्तुळातही 

आपल्या कामात संपूर्णपणे गुंतलेला असतो, 

त्याच्यासाठी वेळ स्वतःच बदलत असतो.

शत्रूला कमकुवत समजू नका, 

आणि खूप बलवान वाटला तर घाबरूही नका.

स्वातंत्र्य हा एक वरदान आहे 

जो प्रत्येकाला मिळण्याचा अधिकार आहे.

जेव्हा तुमच्यात हिम्मत असते, 

तेव्हा डोंगरसुद्धा धुळीच्या ढिगासारखा दिसतो.

धर्म सत्य श्रेष्ठता आणि देवापुढे 

नतमस्तक होणाऱ्यांचा सर्व जग आदर करते.

तुमचा दृढ विश्वास, दृढनिश्चय आणि उत्कटतेने 

सर्वात शक्तिशाली शत्रूंचा पराभव केला जाऊ शकतो.

WhatsApp channel