आज चंद्रदर्शनाचा योग आहे. चंद्रदेव राहुच्या नक्षत्रातुन आणि शुक्राच्या राशीतुन भ्रमण करीत असुन हर्षण योग देखील आहे. वाचा राशीभविष्य!
आज वैवाहिक जीवनात ताणतणाव राहू शकतो. अती भावनाप्रधानतेमुळे मात्र मनःस्तापाचे प्रसंग येतील. आलेला पैसा ताबडतोब गुंतवणूक करणे हिताचे ठरेल. कोणताही विषय जास्त ताणू नये. विचारपूर्वक नियोजन करून कार्य करा. नोकरी व्यापारात आर्थिक प्राप्तीसाठी खुप झगडावे लागेल. असहकार्य लाभेल. मानसिक शारिरिक थकवा जाणवेल.
आज कार्यक्षेत्रात एक वेगळाच ठसा तुम्ही उमटवणार आहात. जोडीदाराची साथ चांगली मिळेल. नवीन घर स्थावर खरेदीचे योग येऊ शकतात. व्यवसायात मनाप्रमाणे कामे मिळतील. व्यावसायिक किवा खाजगी कामासाठी प्रवास घडेल. अनुकुल फळ प्राप्त होतील. नोकरीत योग्य मान सन्मान मिळेल. वाहन घर खरेदी करता योग आहे. प्रयोग यशस्वी ठरतील. वडिलोपार्जित इस्टेटीतून लाभ होईल. व्यवसायातील यश मिळाल्याने आनंदी राहाल.
आज नवीन योजना यशस्वी होतील. मनःशांती मिळेल. फक्त यामध्ये थोडे धाडस दाखवा. प्रेमप्रकरणात यश मिळेल. सहलीचे बेत ठरतील. नोकरीत आत्मविश्वास द्विगुणित होईल. उद्योग व्यापारात अर्थिक स्तोत्र निर्माण होतील. आर्थिक लाभ नक्की होईल. मनोवांच्छित फळ मिळेल. कुटूंबात स्नेह वाढेल. रागावर नियंत्रण ठेवा.
आज आत्मविश्वासाने अभ्यासाकडे लक्ष द्यावे. प्रवासात वादविवाद टाळा. वैवाहिक जीवनात छोट्या मोठ्या तडजोडी कराव्या लागतील. मानसिक अस्थिरता जाणवेल. करिअर संबंधी चिंतेत पडाल. मनमानी पद्धतीने काम करणे टाळा. आर्थिक व्यवहार काळजी पूर्वक करावेत. स्पर्धकांवर मात करावी लागेल. आर्थिक मदत करताना विशेष काळजी घ्या.
आज तडजोडीचे धोरण स्वीकारावे लागेल. आर्थिक उलाढाली यशस्वी ठरतील. विश्वासाला न्याय देण्यासाठी जीवाचं रान कराल. स्वत:च्या हिमतीवर कामे पूर्णत्वाला न्याल. पैशाची अडकलेली कामे मात्र पार पडतील. मोठ्या भावंडांची साथ चांगली मिळेल. व्यापारात फायदा होईल. जोखमीच्या व्यवहारात मात्र सावधानी बाळगा. कल्पनाशक्तीला वाव मिळेल. विद्यार्थ्यांकडून विद्याभ्यासात प्रगती होईल. कौटुंबिक स्नेह निर्माण होईल.
आज वडीलधाऱ्या व्यक्तींची काळजी घेणे आवश्यक आहे. वाहने जपून चालवा. तुमच्या स्वतंत्र आचार विचाराचे फायदे तोटे अनुभवास येतील. परंतु कर्तृत्वाची वेगवेगळी क्षेत्र तुमच्यासाठी खुली होतील. नोकरीत ताण वाढेल. मनस्तापा सारख्या घटना घडतील. अधिक पैसा खर्च कराल. मनावर नियंत्रण ठेवून वाटचाल करा. प्रकृतीची विशेष काळजी घ्या. कमाईपेक्षा खर्च जास्त करू नका. येणाऱ्या खर्चामुळे चिंतीत राहाल.
आज आरोग्या बाबतीत उपचार वेळेवर घ्यावेत. प्रकृती अस्वास्थ्य थोडे जाणवेल. पूर्वी केलेल्या कार्याचा मोबदला मिळेल. विद्यार्थीवर्गानी अभ्यासावर लक्ष केंद्रीत करावे. जुनी घेणी वसुल होतील. कर्जप्रकरण मंजूर होतील. प्रवास सुखकर व लाभदायक होतील. गुंतवणुकीच्या योजना फायदेशीर ठरतील. उत्पनात सुधारणा होतील.
आज प्रचंड प्रतिसाद मिळेल आणि काम करण्यास उत्साह येईल. फक्त कुठेही टोकाची भूमिका घेऊ नका. वारसा हक्काने धनप्राप्तीची शक्यता राहील. संशोधन क्षेत्रात प्रगती कराल. आकस्मिक धनलाभाचा योग आहे. अपेक्षेप्रमाणे यश मिळेल. कामाच्या ठिकाणी कौतूक केले जाईल. मानसन्मान मिळेल. यश मिळाल्याने मन प्रसन्न राहील. आर्थिक गुंतवणुकीकरिता योग्य दिनमान आहे.
आज मानसिक स्वास्थ्य देणाऱ्या घटना घडतील. शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना वेगवेगळ्या संधी येतील. प्रवासात थोडा त्रास होण्याची शक्यता असल्यामुळे उत्तम नियोजन करणे आवश्यक ठरेल. कामात यश मिळण्याचे योग आहेत. जास्त फायदा मिळण्याच्या दृष्टीने केलेले प्रयत्न फायदेशीर राहतील. व्यापारात फसव्या योजनेवर विश्वास ठेवू नका. आर्थिक गुंतवणुक करताना विचार पूर्वक करा. कुटुंबात धार्मिक कार्य घडेल. प्रवासातुन लाभ होईल. कौटुंबिक सौख्य वाढेल.
आज आळशीपणा कराल. काही कामे असतील तर ती रखडतील. तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. प्रकृतीची काळजी घेणे आवश्यक ठरेल. स्वतःच्या हिमतीवर कामे पूर्ण कराल. यश निश्चित मिळेल. मोठी आर्थिक गुंतवणूक करण्याचा विचार करीत असाल तर टाळा. वाईट सवयीचा त्याग करा. मनाची उद्विग्नता वाढेल. मनावर संयम ठेवा. अपघात भय संभवते. आरोग्याच्या बाबतीत दुर्लक्ष करु नका.
आज मतभेद होण्याची शक्यता आहे. घरातील स्त्रियांच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. परदेशगमनात अडचणी आल्यामुळे परदेशी जाण्याचे बेत लांबणीवर पडतील. झोपेच्या तक्रारी डोके वर काढतील. शेअर बाजारात गुंतवणूक करताना अविचार होण्याची शक्यता आहे. भागीदाराकडून उत्तम सहकार्य मिळणार आहे. प्रेम प्रकरणात विरोधाला सामोरे जावे लागेल. महत्वाची कागदोपत्रे मात्र संभाला. गहाळ होण्याची शक्यता आहे. सुखचैनीच्या वस्तूत खर्च वाढेल. व्यापारी वर्गास मोठे व्यवहार फायदेशीर ठरतील.
आज घर सजवण्याचे स्वप्न साकार होईल. घरात उंची वस्तूंची खरेदी कराल. मुलांकडून त्यांच्या धाडसाचे कौतुक ऐकायला मिळेल. धंद्यात वाढ होईल. राजकारणी लोकांना आपला मान जपण्यासाठी संपर्क वाढवावा लागेल. कष्टाच्या मानाने लाभ कमी मिळेल. तुमची प्रगती होईल. कार्यक्षेत्रात उत्तम प्रदर्शन कराल. व्यवसाय वृद्धी होईल. पदोन्नती व प्रगती होईल. विद्यार्थांना नवनवीन क्षेत्रात यश संपादनाची संधी मिळेल. भागीदारासोबत व्यवसाय प्रारंभ करण्यासाठी उत्तम दिवस आहे.