Shiv Jayanti Wishes : तिथीनुसार साजरी करा शिवजयंती! शिवभक्त आणि आप्तजनांना शुभेच्छा द्या, 'हे' खास संदेश पाठवा!-chhatrapati shivaji maharaj jayanti 2024 shiv jayanti wishes in marathi wish your loved once with special message ,धर्म बातम्या
मराठी बातम्या  /  धर्म  /  Shiv Jayanti Wishes : तिथीनुसार साजरी करा शिवजयंती! शिवभक्त आणि आप्तजनांना शुभेच्छा द्या, 'हे' खास संदेश पाठवा!

Shiv Jayanti Wishes : तिथीनुसार साजरी करा शिवजयंती! शिवभक्त आणि आप्तजनांना शुभेच्छा द्या, 'हे' खास संदेश पाठवा!

Mar 27, 2024 04:54 PM IST

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2024 Wishes In Marathi: छत्रपती शिवाजी महाराजांनी नेहमीच आपल्या संस्कृतीचे संवर्धन केले आणि म्हणूनच शिवभक्त तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतात.

तिथीनुसार साजरी करा शिवजयंती! शिवभक्त आणि आप्तजनांना द्या खास शुभेच्छा
तिथीनुसार साजरी करा शिवजयंती! शिवभक्त आणि आप्तजनांना द्या खास शुभेच्छा

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2024 Wishes In Marathi: उद्या म्हणजेच २८ मार्चला तिथीनुसार शिवजयंती साजरी केली जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म १९ फेब्रुवारी रोजी झाला असला, तरी महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तिथीनुसार साजरी केली जाते. 

छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला, तेव्हा कालगणना ही हिंदू पद्धतीनुसार सुरू होती. म्हणूनच काही लोक इंग्रजी कॅलेंडरनुसार १९ फेब्रुवारीला, तर काही लोक तिथीनुसार अर्थात फाल्गुन वद्य तृतीयेला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतात. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती शासनाकडून केवळ एकच दिवस साजरी केली जाते. १९ फेब्रुवारी ही कॅलेंडर तारीख असून, याच दिवशी शासनाच्या वतीने शिवजयंती साजरी केली जाते.

हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या आपल्या लाडक्या राजाची जयंती हा तमाम शिवभक्तांसाठी एक उत्सवच असतो. या दिवशी शिवरायांच्या पराक्रमाचे पोवाडे गायले जातात. महाराष्ट्रासह देशभरात विविध कार्यक्रम साजरे केले जातात. शिवजयंतीच्या निमित्तानं आपल्या आप्तजनांना आणि शिवभक्तांना शुभेच्छा दिल्या जातात. शिवरायांच्या कार्यकर्तृत्वाला साजेशा अशा शुभेच्छा देण्यासाठी अनेक लोक शब्द शोधत असतात. आम्ही त्यांच्यासाठी काही खास शुभेच्छा संदेश घेऊन आलो आहे. ते पुढीलप्रमाणे… 

शिवजयंतीच्या शुभेच्छा द्या, खालील संदेश पाठवा!

जगातील एकमेव राजा असा आहे, ज्याने स्वतःसाठी एकही, राजवाडा महल नाही बांधला,

तो राजा म्हणजे, छत्रपती श्री शिवाजी महाराज,

इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर,

राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती..

 

पुन्हा सुदूर पसरवू, महाराष्ट्राची कीर्ति

शिवरायांची स्मरुन मुर्ती, शिवशंभूंची घेऊया स्फूर्ती

एकच ध्यास, जपू महाराष्ट्राची संस्कृती! शिवजयंतीच्या शुभेच्छा

Chhatrapati Shivaji Maharaj: ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्यांनी पडद्यावर साकारलेत छत्रपती शिवाजी महाराज!

रणांगणात उभ्या रण मर्दाचे लक्ष न लढाईवर असते न विजायावर…

त्याचे लक्ष असते फक्त हातात घेतलेल्या तलवारीच्या कर्तबगारीवर! शिवजयंतीच्या शुभेच्छा!

 

सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा

दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा!

शिवजयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा

 

प्राणपणाने लढून राजा तूच जिंकले किल्ले,

शत्रूंना सदा परतून तूच लावले,

हल्ले धर्म रक्षणा तूच घेतला जन्म जिजाऊ पोटी,

हे शिवराय प्रणाम तुजला कोटी-कोटी!

शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

भगवे रक्त…शरीराने सक्त…

झुकते इथेच दिल्लीचे तख्त…

अन झुकवू शकतात फक्त मराठेच!

हर हर महादेव…

शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

 

अरे कापल्या जरी आमच्या नसा

तरी उधळण होईल भगव्या रक्ताची

आणि फाडली जरी आमची छाती

तरी दिसेल मूर्ती फक्त शिवरायांची…

जय शिवराय! शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा