मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Shani Nakshtra Parivartan : १२ मे रोजी शनिदेव बदलणार स्थान; या ५ राशींवर होणार पैशांचा पाऊस

Shani Nakshtra Parivartan : १२ मे रोजी शनिदेव बदलणार स्थान; या ५ राशींवर होणार पैशांचा पाऊस

Priyanka Chetan Mali HT Marathi
May 02, 2024 05:42 PM IST

Shani Nakshtra Parivartan May 2024 : जोतिष शास्त्रानुसार शनीच्या शुभ स्थितीत असण्याने त्या-त्या काही राशीच्या लोकांचे भाग्य उजळेल. शनिदेवाच्या प्रवेशाने कोणत्या राशीच्या लोकांना भाग्याची खास साथ लाभेल, जाणून घ्या.

शनी नक्षत्र परिवर्तन मे २०२४
शनी नक्षत्र परिवर्तन मे २०२४

ज्योतिष शास्त्रात शनिदेवाला विशेष स्थान आहे. शनीदेवाच्या राशीपरिवर्तनामुळे, नक्षत्रपरिवर्तनामुळे किंवा हालचालींमुळे राशींवर अनेक अनुकूल-प्रतिकूल परिणाम दिसून येतात. शनि महाराज जेव्हा नक्षत्र परिवर्तन करतील तेव्हा काही राशीच्या लोकांसाठी शुभ तर काही राशीच्या लोकांसाठी अशुभ काळ राहील. मे महिन्यात शनिदेव भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करणार आहेत. काही राशीच्या लोकांना याचा चांगला फायदा होणार आहे. येत्या १२ मी रोजी शनिदेव पूर्व भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करतील. जोतिष शास्त्रानुसार शनीच्या शुभ स्थितीत असण्याने त्या-त्या काही राशीच्या लोकांचे भाग्य उजळेल. शनिदेवाच्या प्रवेशाने कोणत्या राशीवर कोणता परिणाम होणार याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया.

मेष- 

शनीदेवाच्या आगमनाने मेष राशीच्या लोकांचे नशीब चांगली साथ देईल. विनाकारणच्या खर्चावरसुद्धा आळा बसणार आहे. मित्रांच्या सहकार्याने कामाच्या ठिकाणी चांगल्या संधी उपलब्ध होतील. धार्मिक कार्य घडतील. अनेक दिवसांपासून अडकलेले पैसे परत मिळतील. शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांना मनासारखे यश मिळेल. कुटुंबात उत्तम संवाद होऊन वडिलांचे सहकार्य लाभेल. वाहन खरेदीचा योग जुळून येईल.

मिथुन- 

शनिदेवाच्या प्रवेशाने मिथुन राशीवरसुद्धा अनुकूल परिणाम होणार आहे. मन प्रसन्न राहील. घरामध्ये धार्मिक कार्य घडून येईल. अचानक धनप्राप्ती होऊ शकते. शैक्षणिक आणि बौद्धिक कार्यात चांगले यश मिळेल. जोडीदाराच्या प्रकृतीत सुधारणा होईल. पैसे मिळवण्याचे नवे मार्ग खुले होतील. व्यवसायात स्थिरता येईल. नोकरीमध्ये बढतीची शक्यता आहे.

सिंह- 

वाहन खरेदीचे सुख लाभेल. विविध गोष्टींमधून लाभ होईल. भावंडांचे सहकार्य आणि सहवास मिळेल. मित्रांकडून आर्थिक फायदा होईल. नोकरीमध्ये वरिष्ठांकडून महत्वाची जबाबदारी मिळेल. वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ होऊ शकतो. त्यामुळे तुमचा आत्मविश्वाससुद्धा भक्कम राहणार आहे.

कन्या- 

कुटुंबात आलेल्या अडचणी दूर होतील. खर्चिक वृत्तीवर ताबा राहील. संशोधक वृत्ती असणाऱ्यांचे परदेशी जाण्याचे योग जुळून येतील. परदेशवारी सुखद होईल. कामाच्या ठिकाणी प्रगती होईल. मन प्रसन्न राहील. 

धनु- 

नोकरीत पदोन्नती होईल. वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहवास लाभेल. मुलांकडून सुखद वार्ता मिळू शकते. प्रत्येक कार्यात जोडीदाराची साथ लाभेल. व्यवसायात अनुकूल प्रगती होईल. वाहन खरेदी होऊ शकते. धार्मिक कार्यात मन गुंतून राहील.आत्मविश्वास वाढेल. आनंदाची बातमी मिळेल.

 

(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel