ज्योतिष शास्त्रानुसार ज्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्याची स्थिती भक्कम असते. त्या व्यक्तीचे नशीब उजळून निघते. अश्या व्यक्ती ज्या कामात हात घालतील त्यात त्यांना यश मिळते. त्यामुळेच सूर्याला ग्रहांचा राजा असे संबोधले जाते. मे महिन्यात अनेक राशींना सूर्य संक्रमणाचा मोठा फायदा होणार आहे. सध्या सूर्य राशीचक्रातील पहिली राशी मेष या राशीत विराजमान आहे. येत्या काही दिवसांत सूर्य मेष राशीतून वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे लवकरच वृषभ राशीच्या लोकांचे नशीब उघडणार आहे. येत्या १४ मे च्या दिवशी सायंकाळी ५ वाजून ५४ मिनिटांनी वृषभ राशीमध्ये सूर्याचे संक्रमण होणार आहे. सूर्याच्या संक्रमणामुळे मेष, सिंह, कर्कसह पाच राशींचे नशीब चमकणार आहे.
सूर्याचे संक्रमण मेष राशीच्या व्यक्तींसाठी अतिशय फायदेशीर ठरणार आहे. विविध कार्यात भरघोस यश मिळणार आहे. अचानक धनप्राप्ती होईल. त्यामुळे बऱ्याच दिवसांपासून असलेले कर्जाचे डोंगर कमी होईल. विद्यार्थ्यांना अभ्यासात मन लागेल. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. नोकरीसोबत आर्थिक प्राप्तीचे इतर मार्ग सापडतील. प्रेमविवाह करण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांना मनासारख्या गोष्टी घडतील.
सूर्याच्या संक्रमणामुळे वृषभ राशीत मोठे सकारात्मक बदल घडून येतील. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. अनेक दिवसांपासून रखडलेली कामे आनंदाने पूर्ण कराल. सरकारी नोकरीत असणाऱ्यांना वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. चांगली कामे होऊन नोकरीत बढती मिळेल. शिवाय वेतनवाढसुद्धा होईल. नवी नोकरी शोधणाऱ्यांची अपेक्षा लवकरच पूर्ण होईल.
सूर्य संक्रमणाचा सर्वात चांगला परिणाम कर्क राशीवर होणार असल्याचे दिसून येत आहे. तुम्हाला कामात आर्थिक लाभ मिळेल. आयुष्यात आर्थिक स्थैर्य लाभेल. व्यावसायिक क्षेत्रात असणाऱ्या लोकांनां याचा जास्तीत-जास्त फायदा होणार आहे. नुकतीच गुंतवणूक केली असेल तर त्यातून नफा लाभणार आहे. जवळच्या व्यक्तीच्या मदतीने घरी लग्नासाठी स्थळ येऊ शकते. अनेक दिवसांपासून अडकून असलेले पैसे परत मिळतील.
सिंह राशीसाठी सूर्याला गुरु समजले जाते. त्यामुळे वृषभ राशीत होणाऱ्या सूर्य संक्रमणाचा सिंह राशीला विशेष लाभ मिळणार आहे. कामाच्या ठिकाणी चांगला जम बसेल. नोकरीसंदर्भात असलेल्या अडचणी दूर होण्यास मदत होईल. वडिलोपार्जित धनसंपत्ती मिळेल. तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतील.
सूर्य संक्रमण कुंभ राशीसाठीसुद्धा फायदेशीर ठरणार आहे. नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला तुमची कलाकौशल्ये सिद्ध करण्याची चांगली संधी मिळेल. कला क्षेत्रातील लोकांना नव्या संधी मिळतील. नव्या व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी हा महिना उत्तम आहे.
संबंधित बातम्या