Dhanu Makar Kumbh Meen Rashi Bhavishya : आज साडेतीन मुहुर्तातील महत्वपूर्ण अक्षय्य तृतीयेचा सण आहे. बुध ग्रह राशीपरिवर्तन करीत मेष राशीत प्रवेश करणार आहे. चंद्र शुक्राच्या राशीतून स्वनक्षत्रातुन भ्रमण करणार असून केतुशी संयोग करीत आहे. अतिगंड योगात धनु, मकर, कुंभ व मीन राशीच्या लोकांसाठी कसा असेल आजचा दिवस! वाचा राशीभविष्य!
धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य स्वरुपाचा असणार आहे. स्वत:बरोबर दुसऱ्याचाही फायदा कराल. शिवाय स्वतःकडचा अधिकार सहजासहजी सोडणार नाही. व्यवसायिकांना योजना आखून केलेल्या कामामुळे आर्थिकदृष्ट्या उन्नती होईल. नविन योजनेतून लाभ होईल. नोकरीत जबाबदारीत वाढ होईल. आपली कामे यशस्वीपणे पार पाडाल. वरिष्ठांकडून कामाची प्रशंसा होईल. व्यापारात आर्थिक प्राप्तीत वाढ होईल. नियोजन उत्तम केले तर निर्णायक कामात यश मिळेल.तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होण्याचे योग आहेत. आज घरातील ज्येष्ठ तुमचे एखादे म्हणने मान्य करतील.
शुभरंग: पिवळा, शुभदिशा: ईशान्य, शुभअंकः ०३, ०६.
मकर राशीसाठी आजचा दिवस आनंददायी असणार आहे. नाविन्यपूर्ण गोष्टींमध्ये संशोधन करून इतरांच्या कौतुकास पात्र व्हाल. हसतमुख राहून इतरांच्या आयुष्यात आनंद निर्माण कराल. कुटुंबातील सदस्यांसोबत असलेले मतभेद आज दूर होतील. कौटुंबिक सहकार्याने दिवस चांगला जाईल. परदेश भ्रमणासाठी उत्तम दिवस आहे. मित्रमैत्रिणींबरोबर सलोख्याचे संबंध राहतील. कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील. व्यापारात आर्थिक लाभ होणार आहे. जुनी आर्थिक गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे. कर्ज प्रकरण मंजुर होतील. प्रेमविवाहाच्या बाबतीत निर्णय जपुन घ्यावा. नवीन योजनेत वाढ विस्तार करण्यासाठी अनुकुल दिवस आहे.
शुभरंग: निळा शुभदिशा: पश्चिम, शुभअंकः ०१, ०८.
कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अनेक कारणांमुळे महत्वाचा ठरणार आहे. कलात्मक कार्यमध्ये रुची वाढेल. आज एखादी मौल्यवान गोष्ट मिळण्याची शक्यता आहे. उद्योग-व्यवसायात अडलेली कामे मार्गी लागतील. परंतु छोट्याशा कारणाने मनशांती बिघडण्याची शक्यता आहे. कौटुंबिक सौख्य व जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. आज आपल्या कुवतीपेक्षा मोठी जबाबदारी स्विकारू नका. लहरी स्वभावावर नियंत्रण ठेवा. आळस झटकून कामाला लागा. शारिरिक आजार उद्भभवण्याची शक्यता आहे. व्यवसायात भागीदारासोबत वाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रागावर ताबा ठेवा. मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. जुन्या मित्रांच्या गाठीभेटी होतील. मित्रांच्या सहवासात दिवसभराचा थकवा निघून जाईल आणि मन प्रफुल्लित होईल.
शुभरंग: जांभळा शुभदिशा: नैऋत्य, शुभअंकः ०१, ०८.
मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस काहीसा चढ उतारांचा असणार आहे. वाहन चालवताना विशेष काळजी घ्या अथवा दुखापत होऊ शकते. वैवाहिक जीवनात जोडीदाराशी तडजोड करावी लागेल. दिवस आपणास काहीसा त्रासदायक ठरणार आहे. महत्वाच्या कामाबाबतीत जपून निर्णय घ्या. तुमच्या मनात नकारात्मक भावना वाढीस लागेल. यामुळे ताणतणाव येण्याची शक्यता आहे. आळशीवृत्ती टाळावी. कुटुंबात वडिलोपार्जित संपत्तीमध्ये नविन समस्या उद्भवतील. अचानक संकट येण्याची संभावना आहे. नातेवाईकांशी व्यवहार जपुन करावेत. तुम्हाला वादामधून नुकसान सहन करावे लागेल.
शुभरंग: पिवळा शुभदिशा: ईशान्य, शुभअंकः ०३, ०५.