मराठी बातम्या  /  क्रीडा  /  WTC Final : तू तो देव माणूस निकला रे... भारतीय चाहते मानतायत केन विल्यमसनचे आभार

WTC Final : तू तो देव माणूस निकला रे... भारतीय चाहते मानतायत केन विल्यमसनचे आभार

Mar 13, 2023, 02:57 PM IST

  • Kane Williamson new zeland vs sri lanka : क्राइस्टचर्च कसोटीत केन विल्यमसनने नाबाद १२१ धावा करत न्यूझीलंडला शेवटच्या चेंडूवर विजय मिळवून दिला. यासह टीम इंडियाने WTC फायनलमध्ये प्रवेश केला. यानंतर भारतीय क्रिकेट चाहते विल्यमसनचे आभार मानत आहेत.

Kane Williamson new zeland vs sri lanka

Kane Williamson new zeland vs sri lanka : क्राइस्टचर्च कसोटीत केन विल्यमसनने नाबाद १२१ धावा करत न्यूझीलंडला शेवटच्या चेंडूवर विजय मिळवून दिला. यासह टीम इंडियाने WTC फायनलमध्ये प्रवेश केला. यानंतर भारतीय क्रिकेट चाहते विल्यमसनचे आभार मानत आहेत.

  • Kane Williamson new zeland vs sri lanka : क्राइस्टचर्च कसोटीत केन विल्यमसनने नाबाद १२१ धावा करत न्यूझीलंडला शेवटच्या चेंडूवर विजय मिळवून दिला. यासह टीम इंडियाने WTC फायनलमध्ये प्रवेश केला. यानंतर भारतीय क्रिकेट चाहते विल्यमसनचे आभार मानत आहेत.

Kane Williamson vs sri lanka last over highlights : क्राइस्टचर्च कसोटीत न्यूझीलंडने केन विल्यमसनच्या शतकाच्या जोरावर श्रीलंकेविरुद्ध रोमहर्षक विजय मिळवला. या कसोटीच्या शेवटच्या चेंडूवर धाव घेत विल्यमसनने किवी संघाला विजय मिळवून दिला. या विजयाचा सर्वात मोठा फायदा टीम इंडियाला झाला. या सामन्यात श्रीलंकेचा पराभव झाल्याने भारतीय संघ WTC फायनलमध्ये पोहोचला आहे. अशा स्थितीत भारतीय चाहते आता केन विल्यमसनचे आभार मानत आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

Achinta Sheuli: वेटलिफ्टर अचिंता शिऊलीचे धक्कादायक कृत्य; रात्रीचं गर्ल्स हॉस्टेलमध्ये घुसला अन्...

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अहमदाबादमध्ये खेळला जाणारा सामना अनिर्णितेच्या दिशेने जात आहे. अशा परिस्थितीत जर श्रीलंकेच्या संघाने क्राइस्टचर्च कसोटी जिंकली असती आणि त्यानंतर वेलिंग्टन कसोटी जिंकली असती, तर श्रीलंकेचा संघ WTC च्या अंतिम फेरीत पोहोचला असता. पण विल्यमसनच्या शतकाने श्रीलंकेचा विजय हिसकावून घेतला. विल्यमसनने १२१ धावांची नाबाद इनिंग खेळून आपल्या संघाला दोन विकेट्सने रोमांचक विजय मिळवून दिला.

थरारक सामना झाला

या सामन्यात श्रीलंकेच्या संघाने पहिले दोन दिवस वर्चस्व गाजवले. यानंतर तिसऱ्या दिवशी किवी संघाचा वरचष्मा होता. त्यानंतर चौथ्या आणि पाचव्या दिवशी दोन्ही संघांमध्ये बरोबरीची लढत झाली. श्रीलंकेने न्यूझीलंडला विजयासाठी २८५ धावांचे लक्ष्य दिले होते, जे न्यूझीलंडने शेवटच्या चेंडूवर ८ विकेट्स गमावून पूर्ण केले.

शेवटच्या षटकात काय घडलं?

श्रीलंकेकडून शेवटचे षटक टाकण्यासाठी असिथा फर्नांडो आला. त्याने पहिल्या २ चेंडूत ३ धावा केल्या. यानंतर तिसऱ्या चेंडूवर मॅट हेन्री धावबाद झाला. आता पुढच्या ३ चेंडूत ५ धावा हव्या होत्या आणि दोन विकेट बाकी होत्या. सामना दोन्ही संघांच्या हातात होता. पण, जोपर्यंत केन विल्यमसन होता तोपर्यंत न्यूझीलंडचे पारडे जड होते. यानंतर चौथ्या चेंडूवर विल्यमसनने चौकार मारून संघाचे काम सोपे केले. या चौकाराने श्रीलंकेचे टेन्शन वाढले. पण गोलंदाज फर्नांडोने मन शांत ठेवले.

शेवटच्या २ चेंडूंवर किवीजला १ धावा करायची होती. फर्नांडोने ५वा चेंडू डॉट टाकला. परिणामी सामन्याचा थरार पुन्हा एकदा उंचावला. आता १ चेंडू आणि १ धाव हवी होती. शेवटच्या लेग बायच्या रुपात ही धाव आली आणि संघाने थरारक विजय मिळवला. विशेष म्हणजे विल्यमसन धावबाद होण्यापासून थोडक्यात वाचला.