मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Women's IPL: महिला आयपीएलसाठी आज लिलाव, १७ कंपन्या लावणार बोली; आतापर्यंतचे संपूर्ण अपडेट्स

Women's IPL: महिला आयपीएलसाठी आज लिलाव, १७ कंपन्या लावणार बोली; आतापर्यंतचे संपूर्ण अपडेट्स

Jan 25, 2023, 12:19 PM IST

  • Women's IPL Auction: महिला आयपीएलसाठी मुंबईत आज ऑक्शन प्रक्रिया पार पडणार असून एकूण १७ कंपन्या बोली लावताना दिसणार आहेत.

Women IPL (Photo Credit: Twitter/ @writer_rajat)

Women's IPL Auction: महिला आयपीएलसाठी मुंबईत आज ऑक्शन प्रक्रिया पार पडणार असून एकूण १७ कंपन्या बोली लावताना दिसणार आहेत.

  • Women's IPL Auction: महिला आयपीएलसाठी मुंबईत आज ऑक्शन प्रक्रिया पार पडणार असून एकूण १७ कंपन्या बोली लावताना दिसणार आहेत.

Women's IPL Auction 2023: महिला आयपीएलसाठी आज (२५ जानेवारी २०२३) मुंबईत ऑक्शन होणार आहे. या ऑक्शनमध्ये पाच संघ खरेदी करण्यासाठी एकूण १७ कंपन्या बोली लावताना दिसणार आहेत, ज्यात सात पुरूष आयपीएल फ्रँचायझीचाही समावेश आहे. हे ऑक्शन बंद दाराआड होणार आहे. स्पर्धेचे वेळापत्रक आणि संघांना मिळालेल्या ऑक्शनच्या पर्सबाबत मोठी अपडेट्स समोर आलीय.

ट्रेंडिंग न्यूज

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

Achinta Sheuli: वेटलिफ्टर अचिंता शिऊलीचे धक्कादायक कृत्य; रात्रीचं गर्ल्स हॉस्टेलमध्ये घुसला अन्...

महिला आयपीएलच्या ऑक्शनमध्ये अदानी ग्रुप, कॅप्री ग्लोबल, हल्दीराम ग्रुप, टोरेंट फार्मा, अपोलो पाईप्स, अमृतलीला एंटरप्रायझेस, श्रीराम ग्रुप, स्लिंगशॉट ३६९ व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्यासह पुरुषांच्या आयपीएल संघांतून मुंबई इंडियन्स, कोलकाता नाइट रायडर्स, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, राजस्थान रॉयल्स, पंजाब किंग्ज, सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स बोली लावताना दिसणार आहेत.

महिला आयपीएलच्या ऑक्शनसाठी प्रत्येकी संघाला १२ कोटी इतकी पर्स उपलब्ध करून दिली आहे. पुढील पाच वर्षे यामध्ये प्रत्येकी दीड कोटींची वाढ होत राहील.पुरुष आयपीएलच्या तुलनेत हा आकडा फारच लहान आहे. पुरुष आयपीएलमध्ये प्रत्येक संघाकडे ९५ कोटी रुपयांची रक्कम होती. विशेष म्हणजे आयपीएल २०२३ च्या पुरुष आयपीएलच्या लिलावात तब्बल पाच खेळाडू १२ कोटींपेक्षा जास्त रकमेत विकले गेले होते.

बीसीसीआयने पाच आयपीएल संघांसाठी आपल्या निविदा दस्तऐवजात एकूण १० शहरांचा समावेश केला आहे. यासाठी कोणतीही मूळ किंमत निश्चित करण्यात आली नाही. यापैकी ५ शहरांत महिला आयपीएलचे सामने खेळवले जाणार आहेत. ज्यात नरेन्द्र मोदी स्टेडियम (अहमदाबाद), ईडन गार्डंस (कोलकाता), एमए चिदंबरम स्टेडियम (चेन्नई), एम चिन्नास्वामी स्टेडियम (बंगळुरू), अरूण जेटली स्टेडियम (दिल्ली), एचपीसीए स्टेडिएम (धर्मशाला), होळकर स्टेडियम (इंदोर), अटल बिहारी स्टेडियम (लखनऊ), बारसपारा स्टेडियम (गुवाहाटी) आणि वानखेडे स्टेडियम/ डीव्हाय पाटील/ब्रेबॉर्न यांसारख्या स्टेडियमचा समावेश करण्यात आला आहे.

महिला आयपीएलचे पहिले तीन हंगाम पाच संघांसह खेळवण्यात येणार आहेत. त्यानंतर ही संख्या एकने वाढेल.तसेच, या स्पर्धेत अंतिम अकरामध्ये पाच विदेशी खेळाडूंना खेळण्याची परवानगी असेल. त्यापैकी एक खेळाडू सहयोगी देशांची असणार आहे

विभाग